Thursday, May 2, 2024
Homeजिल्हाजन्म - मृत्यू प्रमाणपत्रासाठी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कासंदर्भात DYFI चे निवेदन !

जन्म – मृत्यू प्रमाणपत्रासाठी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कासंदर्भात DYFI चे निवेदन !

परभणी : आज डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेकडून नगर परिषद पूर्णा मध्ये जन्म-मृत्यु प्रमाणपत्रासाठी घेण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्काच्या संदर्भातील निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.

सामान्य नागरिकांना जन्म-मृत्यु ची नोंद करत असताना शंभर रुपये शुल्क आकारण्यात येत आहे आणि या शुल्काची पावतीसुद्धा नागरिकांना देण्यात येत नाही, पावती मागितल्यास ‘अरे-रावी’ ची भाषा वापरण्यात येते , याचा सामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे, त्यामुळे जन्म-मृत्यु प्रमाणपत्रासाठी लागणारे शुल्क कमी करून नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्याच्या भूमिकेत असावं.

तसेच आकारण्यात येणाऱ्या शुल्काची पावतीसुद्धा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास नगर परिषदेसमोर तीव्र निदर्शने करण्यात येतील असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष व तालुका सचिव अमन जोंधळे, पांडुरंग दुथडे, हर्षवर्धन अहिरे, धीरज अहिरे, राज जोंधळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय