Saturday, April 20, 2024
HomeNewsशिवसेनेचा दिंडोरीत रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल रास्ता रोको !

शिवसेनेचा दिंडोरीत रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल रास्ता रोको !

दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील व माजी आ. धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली येथे रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल रास्ता रोको करण्यात आला.
दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यांची झालेली चाळण तालुक्यात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना जाग आणण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दररोज छोटे-मोठे अपघात घडवून निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागतात व शेतकऱ्यांनाही रस्त्याने मालाचे वाहतूक करताना फार त्रास होतो यासाठी रास्ता रोको करण्यात आला यावेळी तालुक्याचे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग यावर रोष व्यक्त करीत त्यांना जाग येण्यासाठी रास्ता रोको करावा लागत आहे लवकरात लवकर रस्त्यांबाबत सुधारणा करावी नागरिकांचे हाल होत आहेत येत्या पंधरा दिवसात रस्ते सुधारणा झाली नाही व रस्ते खड्डे मुक्त झाले नाही तर आम्ही प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व शिवसेना यापेक्षाही तीव्र आंदोलन करून शिवसेना स्टाईलने उत्तर देईल असे माजी आमदार धनराज महाले यांनी सांगितले यावेळी जिल्हाप्रमुख सुनील पाटील, सुरेशभाऊ डोखळे, तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, डॉ. विलास देशमुख, जयरामजी डोखळे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले व याप्रसंगी तहसीलदार पंकज पवार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, सुरेश भाऊ डोखळे, उपजिल्हा संघटक सतीश देशमुख, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, अरुण गायकवाड, संगम देशमुख, प्रभाकर जाधव, गोविंद घुमरे, नदीम सय्यद, किरण कावळे, नंदू बोंबले, नदीम सय्यद, निलेश शिंदे, राजू गटकळ, अमोल कदम, उल्हास बोरस्ते, रघुनाथ आहेर, जयराम डोखळे, सुनील मातेरे, बाळासाहेब दिवटे, विजय पिंगळ, अविनाश वाघ, बाबुराव शिंदे, शिवराज गोडसे, सचिन कावळे, संतोष मुरकुटे, झुंबर पाटील, कैलास जाधव, सुनील जाधव, शिवसागर पवार, उज्वला बोराडे, पप्पू शिवले, पिंटू उफाडे, उत्तम जाधव, वैभव महाले, शेखर कांबळे, अश्वमेध गणोरे, सुभाष देशमुख, पुंडलिक आपसूंदे, पप्पू राऊत, शेखर कांबळे, ज्ञानेश्वर शिंदे, सोनु देशमुख, रवी शिंदे, काशिनाथ बदादे, रमेश जाधव, त्रंबक बस्ते, मोहन जाधव, सुरेश देशमुख, प्रमोद पाटील, दौंड बाबा, भास्कर वडजे, दत्तू पाटील आधी बहुसंख्येने पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटना, ज्येष्ठ नागरिक हजर होते. यावेळी पी.आय.प्रमोद वाघ यांचे नेतृत्वाखाली पीएसआय अमोल पवार, कावळे, ए.एस. आय. लहारे, पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
– नारायण काका राजगुरु
शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख दिंडोरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय