---Advertisement---
मोहा : कोरोना महामारीने संपुर्ण महाराष्ट्रात थैमान घातले आहे. कोरोना बाधितांना बेड, ऑक्सिजन तसेच वैद्यकीय सुविधा मिळणे अवघड झाले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सामान्य रुग्णांना सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे.
---Advertisement---
मोहा व परीसरातील वाढत चाललेली कोविड-१९ ची रुग्ण संख्या लक्षात घेता मोहा येथे कोविड सेंटर सुरू करावे यासोबतच co-vaccine व co-shield लसीच्या औषधांची कमतरता प्रकर्षाने जाणवते आहे. यामुळे प्रशासनाने लक्ष केंद्रित करून लसीकरण अधिक गतीने व नियमित करावे या मागण्यांसाठी “डीवायएफआयने” तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
यावेळी मोहा पंचायत समिती सदस्य काॅ. सुदाम शिंदे, काॅ. विशाल देशमुख, काॅ.मनोज देशमुख, काॅ.मनोज स्वामी तसेच डीवायएफआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.