Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यकोरोनातालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करा - कॉ. अजय बुरांडे

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करा – कॉ. अजय बुरांडे

परळी वै. : तालुक्यातील ग्रामीण भागातील रूग्नांच्या सोयीसाठी व तालुक्याच्या ठिकाणी येणारा भार कमी करण्यासाठी तालुक्यातील पाच ही प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

परळी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. तालुक्याच्या ठिकाणी येऊन कोरोना तपासणी करून उपचार करून घेण्यासाठी रुग्ण टाळाटाळ करतात. परिणामी अनेक गावात रुग्ण संख्या दररोज वाढत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना सोयीचे व जवळचे ठिकाण हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तालुक्यातील मोहा, सिरसाळा, पोहनेर, नागापुर व धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे भव्य वास्तुत आहेत. सर्व सोयीनियुक्त असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ कोविड सेंटर सुरू करावे. नागरिक लसीकरणासाठी पुढे येत असताना लसीचा पुरवठा सुरळीत करावा, तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड तपासणी सुरू करावी अशी मागणी किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे, पंचायत समिती सदस्य कॉ. सुदाम शिंदे, कॉ. मुरलीधर नागरगोजो, कॉ. बालासाहेब कडभाने, कॉ. मदन वाघमारे, कॉ. पप्पु देशमुख, कॉ. मनोज देशमुख, विशाल देशमुख, मनोज स्वामी यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय