पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सवलत पात्र प्रवाशांना अनिवार्य करण्यात आलेले स्मार्ट कार्ड काढण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता ३० जूनपर्यंत स्मार्ट कार्ड काढता येणार आहे.
बॉलिवूड सिंगर केके म्हणजेच कृष्णकुमार कुंन्नथ यांचे निधन !
महिनाभराची मुदतवाढ मिळाल्याने आतापर्यंत स्मार्ट कार्ड न काढता आलेल्या हजारो सवलतधारकांना दिलासा मिळाला आहे. १ जुलै २०२२पासून मात्र स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे. एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, पत्रकार यांच्यासह जवळपास २९ समाज घटकांना एसटीच्या प्रवासात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. ही सवलत मिळविण्यासाठी पात्र लाभार्थींकडे एसटीचे स्मार्ट कार्ड असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि, गत दोन वर्षांपासून सुरू असलेली कोरोना संसर्गाची स्थिती व एसटी कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यापासून पुकारलेला संप या दोन कारणांमुळे आगार व विभागीय कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे आतापर्यंत वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरोग्य : पहिल्यांदा सेक्स करताना या 8 गोष्टी ठरतील लाभदायक !
यापूर्वी ३१ मे २०२२ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. परंतु, हजारो सवलतधारकांनी नव्या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केलेली नाही. तसेच नोंदणी केलेल्या अनेकांना स्मार्ट कार्ड वितरित झालेले नाहीत. परिणामी सवलतधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा आयपीएल (Tata IPL) खरंच फ्रि रिचार्ज देत आहे का? वाचा सत्य !
आजपासून राज्यात धावणार इलेक्ट्रिक एसटी बस !