Monday, July 8, 2024
Homeजुन्नरशंकरराव बुट्टेपाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश

शंकरराव बुट्टेपाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश

जुन्नर / आनंद कांबळे : फेब्रुवारी २०२४ मध्ये परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय आणि शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मधील एकूण १२ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. तालुका गुणवत्ता यादीत पहिले ८ विद्यार्थी जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे आहेत. (Junnar)

एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे अशी माहिती जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष धनेश संचेती, विद्यालयाचे मुख्याध्यापक साबळे, इंग्लिश मिडीयम स्कूलचे विभागप्रमुख गायत्री काजळे यांनी दिली. (Junnar)

गुणवत्ता धारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

  1. कौस्तुभ रामदास गवारी (राज्यात १५ वा)
  2. कौशल राजेंद्र कबाडी (तालुक्यात दुसरा)
  3. प्रथमेश पंढरीनाथ शेळकदे (तालुक्यात तिसरा)
  4. केतकी अनिल उंडे (तालुक्यात चौथी)
  5. आराध्य गणेश ससाणे (तालुक्यात पाचवा)
  6. तनिष्का वैभव तिखे (तालुक्यात सहावा)
  7. श्रुती संदीप पर्वते (तालुक्यात आठवी)
  8. स्नेहा सुनील मोदे (तालुक्यात दुसरी )

शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल

  1. ओवी राजेंद्र भोर (तालुक्यात सातवी)
  2. अर्णव महेंद्र लोखंडे (तालुक्यात प्रथम)
  3. शिवानी गणेश इंगवले (तालुक्यात तिसरी)
  4. आरूष सुहास आर्विकर (तालुक्यात चौथा)

महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा विशेष प्रावीण्य यश जालिंदर बारवेकर, प्रथमेश संदीप धाणापूने, अथर्व विठ्ठल भुजबळ, कासार अर्णव प्रविण, साळवे प्रज्योत दीपक, जोगळेकर शुभदा अनिरुद्ध. (Junnar)

सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, पालक यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सदर प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष संजय बुट्टे पाटील, कार्याध्यक्ष धनेश संचेती, कार्यकारिणी ज्येष्ठ सदस्य नितीन मेहता, सुनील गुरव, आनंद सासवडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक साबळे सर यांनी केले, उपस्थितांचे आभार सदानंद उकिर्डे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.गोपाळे मॅडम यांनी केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय