Tuesday, May 14, 2024
Homeताज्या बातम्याAjit Pawar : सख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ, म्हणाले तुझ्याबद्दल…

Ajit Pawar : सख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ, म्हणाले तुझ्याबद्दल…

Ajit Pawar : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली. राजकीय पक्ष देखील कामाला लागले असून त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. बारामती मतदार संघात देखील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सख्ये बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत अजित पवारांचा हात सोडला आहे. (Shrinivas Pawar Speaks about Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता पवार कुटुंबातच अजित पवारांना विरोध वाढत असल्याचे दिसत आहे. अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार आणि वहिनी शर्मिला पवार यांनीही अजित पवारांवर टीका करत आम्ही पवार साहेबांसोबत असल्याचे म्हटले आहे. पवार कुटुंबातील अनेक लोक आता रस्त्यावर उतरून सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसत आहे.

श्रीनिवास पवार म्हणाले की, आजपर्यंत मी नेहमीच अजित पवारांच्या पाठीशी उभा आहे. एक भाऊ म्हणून मी तुझ्याबद्दल सर्व काही ऐकले आहे, पण आता नाही. यावेळी श्रीनिवास पाटील म्हणाले की, शरद पवार यांना या वयात सोडून जाणे चुकीचे असून अजित पवारांचा निर्णय त्यांना मान्य नाही. काटेवाडी येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे व्यवसाय आहेत.

पुढे श्रीनिवास पवार म्हणाले की, जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? यांना जी काही पदं मिळाली ती शरद पवारांमुळेच. आता त्यांना म्हणायचं घरी बसा, किर्तन करा हे काही मला पटलं नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटमुळे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. त्यामुळे बारामती लोकसभेच्या जागेवर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर

अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले

मोठी बातमी : कोल्हापुरात भीषण अपघात ट्रकने ४ मजुरांना चिरडले तर ८ गंभीर जखमी

मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय