पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरू झाली आहे. आता विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबरच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची नाव चर्चेत आले आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझा ने दिले आहे.
खासदार अमोल कोल्हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून असल्याने दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत आल्याचे बोलले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चाही या बैठकीत करण्यात आली. त्यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही नाव पुढे आल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
हे ही वाचा :
महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर
महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात
डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ