Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याSharad Pawar : महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा

Sharad Pawar : महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकिय पक्ष झटून कामाला लागले आहेत. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती यांचे जागा वाटप अद्याप पुर्ण झालेले नाही. अशात शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. Sharad Pawar announced the first candidate of Mahavikas Aghadi

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भोरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत शरद पवारांनी त्यांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. शरद पवार यांनी त्यांची मुलगी बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

सभेले संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, ‘तुमच्या सगळ्यांच्यासमोर उमेदवार म्हणून सुप्रियाची उमेदवारी देत आहोत. तुम्ही सगळ्यांनी तिला तीनदा निवडून दिलं. काम करणाऱ्यांमध्ये पहिल्या दोन-तीन क्रमांकाचे खासदार आहेत, ज्यांचा लौकिक आहे त्यात तुमच्या उमेदवाराचा नाव लौकिक आहे’, असं म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळेंचं कौतुक केलं.

भोरमधील सभेत शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढत होणार असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली जात आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

ब्रेकिंग : बंगळुरूमध्ये भीषण पाणी टंचाई

मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून

संबंधित लेख

लोकप्रिय