Free Jio Recharge offer : सोशल मीडियावर (Social media) अनेकदा मोफत मोबाईल फोन रिचार्जच्या नावाखाली बनावट लिंक व्हायरल होतात. Free Jio Recharge offer आता पुन्हा एकदा जिओ कंपनीच्या नावाने एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या व्हायरल पोस्ट मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रि रिचार्ज दिला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. Is Jio offering free recharge on Mukesh Ambani’s birthday?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाहपूर्व सोहळा जामनगरमध्ये पार पडला. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. अशात सोशल मीडियावर मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ कंपनी ५५५ रुपयांचे ८४ दिवस फ्री रिचार्ज देत आहे, असा दावा करणारा मॅसेज व्हायरल होत आहे.
व्हायरल पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, अंबानी बर्थडे ऑफर JIO कंपनी अपने मालिक मुकेश अंबानी का जन्मदिन मनाने के लिए सभी भारतीय यूजर्स को 84 दिनों के लिए ₹555 का मुफ्त रिचार्ज दे रही है। नीचे दिए गए नीले रंग के लिंक पर क्लिक करके अपना नंबर रिचार्ज करें। या सोबतच लाभ घेण्यासाठी एक लिंक देण्यात आली आहे.
मात्र सोशल मीडियावर दावा केला जाणारा मॅसेज हा फेक असून यात कोणतेही तथ्य नाही. जिओ अनंत अंबानींच्या लग्नानिमित्त किंवा मुकेश अंबानींच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही मोफत रिचार्ज योजना चालवत नाही. व्हायरल होत असलेला मॅसेज फेक आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा
ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार भाजपात जाणार का? रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
ब्रेकिंग : रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; शरद पवार गटाला झटका