अश्विनी जगताप यांच्या प्रचार दौऱ्यास थेरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (SHANKAR JAGTAP)
शंकर जगताप लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार; थेरगावकरांना विश्वास
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकारातून आपण चिंचवडचा ‘न भूतो न भविष्यती’ असा विकास करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल टाकले होते. शंकर जगताप हेदेखील लक्ष्मणभाऊ यांच्याप्रमाणेच विकासाचे स्मार्ट व्हिजन असणारे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या चिंचवड विधानसभेच्या स्मार्ट विकासासाठी स्मार्ट व्हिजन असणाऱ्या शंकर जगताप यांना साथ देऊन विधानसभेत पाठवावे, असे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी थेरगाववासीयांना केले. (SHANKAR JAGTAP)
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी थेरगाव येथील ग्रामस्थ आणि नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला.
यावेळी माजी उपमहापौर झामाताई बारणे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, माजी नगरसेविका आरती चोंधे, भारती विनोदे, करिष्मा बारणे, सनी बारणे यांच्यासह थेरगाव परिसरातील महायुतीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राज्यात महायुतीच्या सरकारने अनेक विधायक निर्णय घेतले मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरू करून महिला भगिनींना मदतीचा हात दिला. शेतकरी बांधव, युवा तरुण यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांकरिता अनेक योजना या सरकारने आणल्या. म्हणून आम्ही महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, असे सांगत थेरगाव परिसरातील मतदारांनी चिंचवड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हे किमान लाखाच्या मताधिक्याने आमदार होतील, असा विश्वास व्यक्त केला. (SHANKAR JAGTAP)
चिंचवड मतदार संघाचा स्मार्ट विकास होणार
या प्रचार दौऱ्यात गावकऱ्यांनी विकासाबाबत आपली अपेक्षा व्यक्त केली. ‘परिसराच्या विकासासाठी शंकर जगताप यांना भरघोस मतदान करा’ असे आवाहन अश्विनी जगताप यांनी केले. तसेच या परिसराचा अधिक वेगाने विकास आणि अधिक सुविधा पुरवण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेचा भागीदार होण्याचे आवाहन केले.
स्थानिक पातळीवर केलेल्या चर्चेमुळे, अनेक ग्रामस्थांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्धार केला, ज्यामुळे थेरगाव परिसराच्या प्रगतीला नव्याने दिशा मिळणार आहे असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
आमचे आणि थेरगावकरांचे जुने ऋणानुबंध आहेत. जे आम्ही कायम जोपासले आहेत. यापूर्वीही थेरगावच्या ग्रामस्थांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्व. लक्ष्मण जगताप असतील किंवा मी असेल आमच्या दोघांवरही विश्वास व्यक्त करत भरभरून मतदान केले. यावेळी हाच विश्वास महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यावरही ठेवून त्यांना आपल्या थेरगावच्या आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या स्मार्ट विकासासाठी विधानसभेत पाठवावे.
– अश्विनी लक्ष्मण जगताप
(आमदार)
हेही वाचा :
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर
नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा
शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट
गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या
अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर