Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाविविध समाजोपयोगी उपक्रमांसोबत गणेशोत्सव साजरा करणार - शहीद भगतसिंग तरुण मंडळ

विविध समाजोपयोगी उपक्रमांसोबत गणेशोत्सव साजरा करणार – शहीद भगतसिंग तरुण मंडळ

कोल्हापूर : सालाबादप्रमाणे याही वर्षी शहीद भगतसिंग तरुण मंडळ, जुना बुधवार पेठ यांच्याकडून २१ फुटी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शनिवार दिनांक २७ ऑगस्ट २०२२ रोजी बिन खांबी गणेश मंदिर येथून श्रींचा आगमन सोहळा पार पडणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक,राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी राजेश क्षीरसागर, छत्रपती मालोजी राजे व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आगमन सोहळा पार पडणार आहे.

यानंतरच्या काळात महाप्रसाद, रांगोळी स्पर्धा, गौरी सजावट सत्यनारायण पूजा, भजन इत्यादी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. अशी माहिती उत्सव कमिटी अध्यक्ष गणेश जाधव व उपाध्यक्ष अमित चव्हाण यांनी दिली पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला गणेश जाधव, अमित चव्हाण, दिग्विजय पवार, पिंटू स्वामी व श्रीशैल स्वामी व मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय