Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजयपूर येथे होणाऱ्या जनवादी लेखक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी कवी सुदेश इंगळे निमंत्रित

जयपूर येथे होणाऱ्या जनवादी लेखक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी कवी सुदेश इंगळे निमंत्रित

मुंबई : जनवादी लेखक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन जयपूर येथे २३ – २४ – २५ सप्टेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. या अधिवेशनात देशभरातील कवी, साहित्यिक, अभिनेते, नाटककार उपस्थित राहणार आहेत. विविध सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांवर चर्चा जनवादी लेखक संघाच्या अधिवेशनात होत असते. यावेळी मराठी कवी सुदेश इंगळे यांना या राष्ट्रीय अधिवेशनसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

सुदेश इंगळे यांचे ‘उगाच काहीतरी’, ‘काळया ठिपक्यांचे सोनेरी काळवीट’ आणि ‘निम्म्या रेषांचा अपरिग्रह’ हे तीन कवितासंग्रह प्रकाशित असून ‘…माझा खापर ढापर mRNA ‘ हा चौथा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सुदेश इंगळे हे जागतिकीकरणाच्या काळातील मराठीमधील एक महत्त्वाचे कवी मानले जातात. तसेच विविध सामाजिक, शैक्षिणक प्रश्नावर त्यांचे लेख गांभीर्याने वाचले जातात.

यावेळी बोलताना सुदेश इंगळे म्हणाले,” जनवादी लेखक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी निमंत्रण ही अत्यंत सन्मानाची आणि सोबतच जबाबदारीची गोष्ट आहे. ज्या व्यवस्थाहीन काळात आपण जगत आहोत त्या काळाला कवित्वाची नितांत गरज आहे. आयुष्यात येणारे परिपक्व काव्यच पिढीला तारतम्य देऊ शकेल. खूप अनुभवी लेखक, कवींना भेटता येईल. जनवादी विचारांची लढाई अजून विवेकाने, सापेक्षाने करण्याची प्रेरणा मिळेल.”

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय