औरंगाबाद : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) च्या वतीने आज (दि.७) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांच्या विविध समस्या व मागण्यांना घेऊन तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांच्या विविध घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून गेले. परंतु या प्रसंगी विद्यापीठ प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी मागण्याचे निवेदन घेण्यासाठी उपस्थित नसल्यामुळे आंदोलक विद्यार्थी संतापले त्यामुळे संतप्त आंदोलक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात सुरू असलेली विद्यापीठ अधिसभेची विद्यापीठ अर्थसंकल्पाची सुरू असलेली बैठक उधळण्याचा दिलेल्या इशाऱ्या नंतर विद्यापीठ प्रशासनाकडून परीक्षा नियंत्रक डॉ.गणेश मंझा व विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संजय संभाळकर हे अधिकारी आंदोलक विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी व निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर आले.
नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण
या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या दीर्घ चर्चेअंती लवकरात लवकर या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले. परंतु एस एफ आय (SFI) च्या वतीने या समस्या व मागण्या पुढील दहा दिवसांत मान्य करून त्या सोडवण्यात याव्यात अन्यथा 15 मार्च 2022 पासून आमरण उपोषण करण्याचा व याहीपेक्षा जास्त तीव्रतेचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देत यापेक्षाही मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असे म्हटले आहे.
या प्रसंगी या निदर्शनात नितीन वाव्हळे, लोकेश कांबळे, अशोक शेरकर, भगवान श्रावने, आकाश देशमुख, मनीषा बल्लाळ, सौमिक मंडल, गणेश अलगुडे, गजानन शिंदे, प्रतीक शिंदे, श्रीनिवास लटांगे, सत्यजित मस्के, कानिफनाथ कादे, प्रदीप चव्हाण, ज्ञानेश्वर पांचाळ, अभिमान भोसले, योगेश अरसूळ, गणेश गायकवाड, बळीराम चव्हाण इत्यादी पदाधिकारी विद्यार्थी कार्यकर्ते व विद्यापीठाच्या विविध विभागातील विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.
ब्रेकिंग : राज्यातील निवडणूका लांबणीवर !
स्नेहमेळावे म्हणजे बूस्टर डोसच.. ३५ वर्षापूर्वीचे विद्यार्थी पुन्हा शाळेत..
आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
१. ‘कमवा व शिका’ ही योजना तात्काळ सुरू करण्यात यावी तसेच मागेल त्या विद्यार्थ्याला या योजनेत काम देण्यात यावे.
२. पी.एच.डी (PhD) संशोधक विद्यार्थ्यांच्या COVID-19 लॉकडाउन काळातील प्रोग्रेस रिपार्ट (सहामाही प्रगती अहवाल) शुल्क, प्रयोग शाळा शुल्क, शिकवणी शुल्क माफ करण्यात यावे.
३. विद्यापीठातील सर्व वसतिगृह सुरू होऊनही या वसतिगृहाचे साफसफाई व दुरुस्तीचे चे काम अद्यापही करण्यात आलेले नाही ते तात्काळ करण्यात यावेत.
एखादा सिनेमा आवडला आणि त्याबद्दल लिहिण्याची हल्ली चोरीच झालीये, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत..
४. विद्यापीठातील सर्व विभागातील रिक्त असलेल्या पूर्णवेळ प्राध्यापकांच्या जागा तात्काळ भरण्यात याव्या.
५. सध्या सुरू असलेल्या PET प्रोसेस मधील ज्या विद्यार्थ्यांना संशोधक मार्गदर्शक उपलब्ध झाले नाहीत , अद्याप DRC झालेली नाही त्या विद्यार्थ्यांना तात्काळ संशोधक मार्गदर्शक व रिसर्च सेंटरउपलब्ध करून देण्यात यावे.त्याचबरोबर तात्काळ प्रॉव्हिजनल देण्यात यावेत.
६. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठ अंतर्गत परिसरात इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात यावी.
७. विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांसाठी नवीन दोन कॅन्टीन सुरू करण्यात याव्या.
बँक ऑफ बडोदा (BOB) विविध पदांच्या एकूण १०५ जागा !
८. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी(मुलांसाठी) नवीन 1000 विद्यार्थिक्षमतेचे वसतिगृह बांधण्याच्या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?
९. विद्यापीठाचे विविध सर्क्युलर व जी.आर. हे विद्यापीठाच्या सर्व विभाग, वसतिगृह, ग्रंथालय व वाचनालयाच्या नोटीस बोर्ड वर नियमित पणे लावण्यात यावे.
१०. परीक्षा भवन येथील विद्यार्थ्यांच्या सोयी साठी असलेल्या विविध खिडक्यांवर सुव्यवस्थितरीत्या फॅक्लटी व खिडकी क्रमांकाचे फलक लावण्यात यावे. त्याचबरोबर दर्शनी भागावर विविध कागदपत्रांसाठी लागणार किमान कालावधी याचा फलक लावण्यात यावा. तसेच परीक्षा भवन मध्ये असलेल्या रिक्त कर्मचाऱ्यांच्या जागा तत्काळ भरण्यात याव्यात.
११. विद्यापीठाच्या सर्व वसतिगृहासमोर वसतिगृहाचे दिशादर्शक फलक लावण्यात यावे.
१२. विद्यापीठ वाचनालायतील विद्यार्थ्यांना जेवणाच्या व्यवस्थेसाठी नाराळीबाग लॉन खुले करण्यात यावे.