Sunday, May 5, 2024
Homeजुन्नरजुन्नर : मनरेगा अंतर्गत येणाऱ्या योजनांतून होतोय निमगिरी गावाचा पायाभूत सुविधांचा विकास

जुन्नर : मनरेगा अंतर्गत येणाऱ्या योजनांतून होतोय निमगिरी गावाचा पायाभूत सुविधांचा विकास

जुन्नर : मनरेगा योजना ही ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली ठरणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारही मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीसाठी सामुदायिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना विकसित करणे. परंतु योजनांची आणि कामाची प्रत्यक्ष अनुभव होत नसल्याने जुन्नर तालुका किसान सभा सातत्याने प्रयत्नशील आहे.

किसान सभेच्या पुढाकारामुळेच निमगिरी गावात  रोजगार हमी योजनेतून रानचरी ते अस्वले वस्ती पानंद रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. किसान सभेच्या कार्यकत्यानी भेट देऊन कामाची पाहणी करण्यात आली. या रस्त्याच्या कामावर विशेषतः महिला मजूर आहेत. या कामातून महिलांना गावातच सन्मानाच्या रोजगार मिळाला आहे.

जुन्नर : स्नेहमेळावे म्हणजे बूस्टर डोसच.. ३५ वर्षापूर्वीचे विद्यार्थी पुन्हा शाळेत..


जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस ला धक्का, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर प्रमुखाचा भाजपात प्रवेश !

यावेळी बोलतांना महिला म्हणाल्या, आपल्याच रस्त्याचे काम करणायचे समाधान, आपल्या घरातील सर्व व्यवस्था पाहून काम करता येते, त्याचबरोबर आम्ही सर्व महिला एकत्र येऊन काम करण्याचा आनंद, घराजवळ काम मिळाल्याने कुटूंबातील मुलाकडे लक्ष देता येते. तसेच घराजवळ काम मिळाल्याने कोणत्याही बाहेर गावी कामासाठी वणवण करावी लागत नाही. गावात काम मिळाल्याने धोकादायक वाहनातून प्रवास करावा लागत नाही, असेच काम सातत्याने मिळाले पाहिजे.

तसेच महिला म्हणाल्या,रोजगार हमी कायद्याच्या नियमाप्रमाणे रोज पडणे अपेक्षित आहे. स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक कठीण परिश्रमाची कामे

काढत आहेत आणि सतत कामाची चुकीची माहिती देत असून तुम्हाला रोज कमी पडेल अशी भीती महिलांना वाटते आहे. रस्ता खोदाई काम खूप कठीण आहे. त्यामध्ये दगड मोठया प्रमाणात निघत आहे. त्यामुळे कठीण जागेवर खोल खोदाई निघत नाही. त्यामुळे मोजमाप कमी पडू शकते,अशी भीती महिलांच्या मनात आहे.

जुन्नर : माणकेश्वर येथे जात प्रमाणपत्र वाटप


जुन्नर : खिरेश्वरची मुलं लई हुशार..!

सकारात्मक आणि नकारात्मक बाबी असूनही महिला हे काम करायला तयार आहेत आणि पुढेही मनरेगा अंतर्गत येणारी कामे आम्हाला मिळावी असेही महिला म्हणाल्या.

यावेळी किसान सभेचे जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी, वनधन योजनेचे राजेंद्र शेळके, रोजगार सेवक देवराम असवले आणि 22 महिला मजूर उपस्थित होत्या.

काय आहेत महिलांच्या अपेक्षा !

महिला मजुरांच्या कठीण श्रमाची कामे देऊ नयेत, मनरेगा अंतर्गत येणाऱ्या कामाची माहिती दयावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, प्राथमिक आरोग्य पेटी कामाच्या ठिकाणी ठेवावी, अशा अपेक्षा महिलांनी व्यक्त केली.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय