Sunday, March 16, 2025

जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस ला धक्का, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर प्रमुखाचा भाजपात प्रवेश !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

जुन्नर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सेल चे जुन्नर शहर प्रमुख मंदार किरण बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशासाठी जुन्नर शहरातून मोठी रॅली काढण्यात आली होती.

जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या ओझर गावच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ आज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी हा प्रवेश संपन्न झाला.

जुन्नर : माणकेश्वर येथे जात प्रमाणपत्र वाटप

जुन्नर : खिरेश्वरची मुलं लई हुशार..!

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते.

मंदार बुट्टे पाटील यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केल्याने ते नगरसेवक पदांची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे ‌‌. मंदार सुट्टे पाटील यांच्या प्रवेशाने भाजपाला जुन्नर शहरात नवसंजीवनी मिळाणार आहे.

नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण

जुन्नर : स्नेहमेळावे म्हणजे बूस्टर डोसच.. ३५ वर्षापूर्वीचे विद्यार्थी पुन्हा शाळेत..


Related Articles

- Advertisement -

Latest Articles