Sunday, May 19, 2024
Homeशिक्षणसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढसह इतर मागण्यांबाबत प्र-कुलगुरूंशी SFI च्या शिष्टमंडळाची चर्चा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढसह इतर मागण्यांबाबत प्र-कुलगुरूंशी SFI च्या शिष्टमंडळाची चर्चा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच. डी., पदव्युत्तर पदवी व वसतिगृहाची शुल्कवाढ करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने केलेली ही शुल्कवाढ अन्यायकारक असून ती तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या वतीने विद्यापीठाचे प्र-कुलगुरू संजिव सोनावणे यांना देण्यात आले.

आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असताना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच. डी., पदव्युत्तर पदवी व वसतिगृहाची केलेली शुल्कवाढ रद्द करण्यात यावी. विद्यापीठातील संशोधन केंद्रे व विद्यापीठ संलग्न संशोधन केंन्द्रांचे शुल्क सारखेच असावे. संशोधक विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे विद्यावेतन मिळावे. विद्यापीठाच्या भोजनगृहातील मिनी थाळीची दर वाढ रद्द करावी. कोर्स वर्कच्या शुल्कातूनच पब्लिकेशन एंड इथिक्स कोर्स विद्यार्थ्यांसाठी चालवला जावा. त्यासाठी घेतले जात असणारे शुल्क रद्द करण्यात यावे, या मागण्याबाबतचे निवेदन प्र-कुलगुरू संजिव सोनावणे यांना स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या वतीने देण्यात आले. तसेच चर्चा करण्यात आली.

यावेळी सायबर सिक्युरिटी, स्किल डेव्हलपमेंन्टची फी रद्द करणार आणि पब्लिकेशन अँड इथिक्सची फी कमी करण्याबाबतचे परिपत्रक आज संध्याकाळ पर्यत काढणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू संजिव सोनावणे यांनी दिल्याचे एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांनी सांगितले. यासोबतच अनिकेत कॅन्टीन चालू करण्याची मागणीवर आढावा घेऊन निर्णय घेऊ, फूड मॉलची बैठक क्षमता वाढवू आणि मिनी थाळी संदर्भात कमिटी सोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

यावेळी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ, अभिषेक शिंदे, पुजा करवंदे, शितल थोरे, नितीन हालूंगडे, अनंत शेळके, अशोक जोगदंड उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय