Friday, May 17, 2024
Homeजिल्हाराज्यातील "या" जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के, 4.6 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद 

राज्यातील “या” जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के, 4.6 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद 

सोलापूर : राज्यात एकीकडे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू असताना अनेक जिल्ह्यांमध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. कोयनेच्या भुकंपमापन केंद्रावर 4.6 रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे . 

समोर आलेल्या माहितीनुसार, सोलापूरमध्ये (Solapur) भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. सकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. सोलापूरपासून काही अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यात विजयपूर येथे भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी 4.9 रिस्टर स्केल भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. या भूकंपामुळे काही दुर्घटना घडली आहे का ? याची जिल्हा प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे. भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समजली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय