Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअनेक वर्षाच्या लढाईनंतर हॉकर्स झोनची निर्मिती होत आहे - काशिनाथ नखाते

अनेक वर्षाच्या लढाईनंतर हॉकर्स झोनची निर्मिती होत आहे – काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड : अनेक वर्षाच्या लढाईनंतर हॉकर्स झोनची निर्मिती होत आहे. तर हे करून घेण्यासाठी आम्ही फार मोठा संघर्ष केला आहे. सर्व गोष्टी एकाच वेळेला मार्गी लागणार नाहीत, असे मत कामगार नेते महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी घरकुल येथील हॉकर्स झोन निर्मिती संबंधी प्रतिक्रिया देताना व्यक्त केले आहे.

ते पुढे म्हणाले की, घरकुल येथे हातगाडी स्टॉल धारकांसाठी वाटप करण्यात आलेले नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीचे झालेले आहे. दोन-तीन वेळा सर्वेक्षण झालेले असून याच्यामध्ये सर्वच्या सर्व मूळ लाभार्थी आहेत. उर्वरीत विक्रेत्यांचा पण समावेश होणार आहे. यात गैरप्रकार नाही सदरच्या ठिकाणी थोडासा चिखल आहे ते साफ करून त्या ठिकाणीही मुरूम टाकून आणि सिमेंटचा पक्का रस्ता करून सदरच्या ठिकाणी त्यांना पत्र्याचे शेड करून देण्यात येणार आहे. तसेच महिला पुरुष स्वच्छतागृहाची मागणीही केलेले आहे ते लवकरात लवकर काम सुरू होणार आहे.

खऱ्या व सर्वसामान्य विक्रेत्यांसाठी जागा देण्यात आली आहे. मात्र जे लोक घरी राहतात जे व्यवसायात करीत नाहीत अशा लोकांची नावे घ्या म्हणणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे मूळ विक्री करणाऱ्या लोकांवरती अन्याय होणार असून ते वंचित राहू शकतात. अनेक वर्षापासून ऊन पावसात राहणाऱ्या विक्रेत्यांसाठी हक्काचा हॉकर झोन मिळाला आहे. आयुक्त व क्षेत्रीय अधिकारी यांनी सहकार्य केले आहे. यामुळे आम्ही व विक्रेते समाधानी आहोत, असे काशीनाथ नखाते म्हणाले.

  • संपादन – क्रांतिकुमार कडुलकर
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय