Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचऱ्होली येथील किड्स पॅराडाईस स्कूल व कीड इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने विद्यार्थी दिंडीचे...

चऱ्होली येथील किड्स पॅराडाईस स्कूल व कीड इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने विद्यार्थी दिंडीचे आयोजन

पिंपरी चिंचवड : चऱ्होली काळे कॉलनीतील किड्स पॅराडाईस स्कूल व कीड इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आज विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते,यावेळी वेगवेगळ्या वेशभूषेत विद्यार्थी व विद्यार्थिनीनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी शाळेचे अध्यक्ष अँड अनंत काळे म्हणाले की, मुलांमध्ये आपली संतांची संस्कृती आणि आपल्या संस्कृती दर्शन व्हावे आणि साधू संतांनी जो त्याग केला आहे,त्याचे स्मरण व्हावे म्हणून आम्ही दरवर्षी आमच्या शाळेच्या माध्यमातून दिंडीचे आयोजन करत असतो.

यावेळी अँड.सचिन काळे म्हणाले की विद्यार्थ्याबरोबर पालखीच्या दिंडीतही पालकही सहभागी होऊन आनंद घेतात. माऊली, माऊली नामस्मरणाने सर्व परिसर दुमदुमला होता. नागरिक संतांच्या भुमिकेतील मुलाचे कौतुक करत होते,ढोल,ताशा वाजवून लेझीम खेळून धाकट्या पादुका चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीमध्ये इंद्रजीत शिंगाडे (विठ्ठल) वेदिका क्षीरसागर( रुक्मिणी) समर्थ गायकवाड( निवृत्ती महाराज) अभिजीत दहिफळे (सोपान काका) अभिषेक दिसले (ज्ञानेश्वर) क्रांती इंगळे (मुक्ताईबाई) सोहम गायकवाड (तुकाराम महाराज) प्रथमेश तापकीर (नामदेव महाराज) अनुज बहले (एकनाथ महाराज) अनुष्का गवारे (जनाबाई) तर विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत होते.

यावेळी शाळेचे अध्यक्ष अँड अनंत काळे, संचालक अँड सचिन काळे, नवनाथ काळे, संचालिका कुंदा काळे, कीड पँराडाईसच्या मुख्याध्यापिका स्वाती काळे, तर कीड इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा काळे उपस्थित होत्या, शिक्षिका ज्योती ढवळे, संगीता सूर्यवंशी, सपना शिंपी, हर्षाली पुणेकर, रेश्मा चौधरी, सोनाली जाने, स्मिता काटे, प्रीती तापकीर यांनी नऊवारी साड्या घालून दिंडीतील विद्यार्थ्यांच्या महिला पाल्याबरोबर फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. प्रशांत हराळे, आण्णा जोगदंड सह अनेक पालक व नागरीक ही सहभागी झाले होते.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय