Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडहॉकर्स झोन पुनर्वसनाच्या नावाखाली फेरीवाल्यांची फसवणूक थांबवा - बाबा कांबळे यांची मागणी 

हॉकर्स झोन पुनर्वसनाच्या नावाखाली फेरीवाल्यांची फसवणूक थांबवा – बाबा कांबळे यांची मागणी 

घरकुलमधील हॉकर्स झोन महापालिकेचा स्टंट, प्राथमिक सुविधा नाहीत; फेरीवाल्यांची थट्टा केल्याचा आरोप

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मनपाच्या ‘फ’ विभागाअंतर्गत घरकुल वसाहत चिखली येथे मनपाने नुकताच हॉकर्स झोन निर्माण करून तेथे निवडक 80 फेरीवाले आणि पथ विक्रेत्यांना हक्काच्या जागा दिल्या,त्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला,मात्र सादर ठिकाणी  नागरीसुविधा,स्वछतासेवेचा  अभाव आहे.व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्राथमिक सुविधा मनपाने तिथे दिलेली नाही.स्मार्ट सिटी अंतर्गत हॉकर्स झोन कसे असले पाहिजेत याचेही भान प्रशासन आणि आयोजकांना राहिले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. घरकुल चिखली येथे नुकतेच व क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे यांच्या हस्ते गाळे वाटप करण्यात आले आहे.

या गाळे वाटपात गरीब व्यावसायिकांवर अन्याय झाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केली आहे. हॉकर्स झोन पुनर्वसनाच्या नावाखाली फेरीवाल्यांची फसवणूक थांबवा अशी मागणीही बाबा कांबळे यांनी केली आहे.अन्यथा फेरीवाल्यांना घेऊन मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.

वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांनुसार महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार हे गाळे वाटप करण्यात आले असे सांगण्यात आले आहे. या वेळी फेरीवाल्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करत आहोत. आम्ही घरकुल मध्ये राहायला आहे. परंतु अधिकारी मनमानी पद्धतीने काम करत आहेत. आमचे ऐकत नाहीत. आम्हाला न्याय देत नाहीत. त्यामुळे या बाबत न्याय द्या, अशा भावना फेरीवाल्यांनी व्यक्त केल्या.

या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, 2005 पासून आम्ही फेरीवाल्यांसाठी संघर्ष सुरू केला आहे. 2007 मध्ये फेरीवाल्यांचा पहिला कायदा मंजूर करून घेतला. परंतु हा कायदा नेमका काय आहे ? त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा आहेत ? फेरीवाल्यांचे पुनर्वसन कशा पद्धतीने केले पाहिजे ? त्यासाठी कोणकोणत्या सुविधा असल्या पाहिजे ? याबद्दल सर्व या धोरणामध्ये तरतूद करण्यात आली आहे.मात्र त्याची अधिकारी अंमलबजावणी करत नाहीत. घरकुलमधील हॉकर्स झोन म्हणजे फेरीवाल्यांची थट्टा आहे. महापालिकेने मागणी  असूनही फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केलेले नाही, असाही आरोप केला जात आहे.

पिंपरी चिंचवड मनपाने शहरातील हॉकर्स झोन साठी कोणतेही स्पष्ट धोरण, योजना आद्यपही गुलदस्त्यात ठेवली आहे. शहरातील गोरगरीब पथविक्रेते,फेरीवाले गेली दहा वर्षे व्यवसाय परवाना, ओळखपत्रे दिलेली नाहीत. पिंपरी चिंचवड मनपाला स्मार्ट सिटी अंतर्गत आलेला निधी हॉकर्स झोनच्या विकासासाठी होता. असा निधी किती आला आणि किती गरजू स्ट्रीट व्हेंडर्स, फेरीवाला यांना याचा फेरआढावा प्रशासनाने द्यावा.

ते पुढे म्हणाले की, घरकुल मध्ये हॉकर्स झोनचे  उदघाटन करताना प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन केले आहे. प्राथमिक सुविधा नागरिकांच्या हिताना प्राधान्य नसलेल्या घरकुल योजनेमध्ये प्राधान्यक्रम देताना घरकुल मधील शेकडो पथविक्रेते,फेरीवाले यांना विश्वसात घेतलेले नाही, मात्र मनमानी पद्धतीने फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया शहरांमध्ये सुरू आहे. त्यामध्ये क्षेत्रीय कार्यालय येथे अनागोंदी कारभार सुरू आहे. यापूर्वी देखील कृष्णानगर येथील भाजी मंडईमध्ये पैसे घेतल्याचे आरोप अधिकाऱ्यांवर झाले. आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, असे बाबा कांबळे म्हणाले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय