Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 69 वा वर्धापन दिन साजरा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 69 वा वर्धापन दिन साजरा

पुणे : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त सहकार नगर येथे कामगार स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते, या मेळाव्याचे उद्घाटन गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती भारती चव्हाण यांनी केली तर दिपप्रज्वलन कामगार भूषण राजेंद्र वाघ यांनी केले.

यावेळी सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त समाधान भोसले यांनी कामगार कल्याण मंडळांनी राबवलेल्या विविविध योजनांची माहिती देऊन कामगारांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा, असे आव्हान उपस्थित कामगारांना व विविध कपन्यांच्या उपस्थितीत प्रतिनिधींना केले.

यावेळी गुणवंत कामगार दादा पासलकर यांनी सांगितले की, मी 1967 पासून मंडळाच्या कार्याशी निगडित असून अनेक योजनांची माहिती मी कामगारांना देत आलो आहे आणि यापुढेही देत राहणार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीताई चव्हाण यांनी मंडळांनी राबवलेल्या विविध योजनांचे कौतुक करून कामगारांचे व आमचे मंडळाची कौटुंबिक नाते असल्याचे सांगून सर्व योजनांचा लाभ कामगारांनी घ्यावा मंडळास काही गरज भासल्यास मी निश्चित मदत करेल असे आश्वासन दिले.सुनीता गोकर्ण यांच्या मराठी भावगीत व भक्ती गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त समाधान भोसले, कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष भारतीताई चव्हाण, गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, संजय गोळे, संगीता जोगदंड, तानाजी एकोंडे, भरत शिंदे, मोहन गायकवाड, प्रमोद बनसोडे, दिलीप पासलकर, संपत खैरे, रवींद्र चव्हाण, सुधीर मेटेकर, जादूगार रामचंद्र चणचणकर, चंद्रकांत मांढरे, सुरेश निकम, नारायण पिंगळे, बालकृष्ण नेरकर, बळीराम शेवले, युनियनचे प्रतिनिधी प्रमोद पाटील, दिगंबर पोकळे तसेच पिंपरी चिंचवड व पुणे व पुणे जिल्ह्यातील केंद्र संचालक प्रवीण बोरसे, संजय सुर्वे, सुवास माने, सुनील बोरावडे, अविनाश राऊत हे केंद्र संचालक उपस्थित होते.

  • संपादन – क्रांतिकुमार कडुलकर
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय