Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडघरकुलमध्ये सुविधा नसलेल्या हॉकर्स झोनची घाई कशाला - गणेश दराडे

घरकुलमध्ये सुविधा नसलेल्या हॉकर्स झोनची घाई कशाला – गणेश दराडे

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची टीका

पिंपरी चिंचवड : घरकुल चिखली येथील हॉकर्स झोनची निर्मिती आणि उदघाटन करताना महानगरपालिकेने अक्षम्य घाई, नियमांची पायमल्ली केली आहे. झोन मध्ये जागा देताना त्या जागेमध्ये कोणत्याही प्राथमिक सुविधा दिलेल्या नाहीत. चिखलाचे साम्राज, गैरसोय असलेल्या जागेमध्ये ग्राहकांना आणि विक्रेत्यांना हा हॉकर्स झोन उपयोगाचा नाही, असे पिंपरी चिंचवड महानगर हॉकर्स युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड गणेश दराडे म्हणाले.

दराडे पुढे म्हणाले, घरकुल येथे गेली दहा वर्षे व्यवसाय करणाऱ्या शेकडो गरीब पथविक्रेते, फेरीवाले याना मनपाने न्याय दिलेला नाही, गेल्या दहा वर्षात शहरातील विविध प्रभागात गरजू आणि बेरोजगार कुटुंबे रस्त्यावर आणि हातगाड्या ढकलून उदरनिर्वाह करत आहेत. त्यांची गणना करून सर्वसमावेशक फेरीवाला धोरण, हॉकर्स झोन निर्मितीसाठी मनपाने पारदर्शक योजना राबवली नाही. असा आरोप दराडे यांनी केला आहे.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय