Wednesday, July 3, 2024
Homeजिल्हाPune : अनंतराव पवार कॉलेजच्या वतीने स्कूल-कॉलेज कनेक्ट कार्यक्रम संपन्न

Pune : अनंतराव पवार कॉलेजच्या वतीने स्कूल-कॉलेज कनेक्ट कार्यक्रम संपन्न

पिरंगूट / दिपाली पवळे – आंग्रे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आर्थिक सहकार्याने पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयाने स्कूल-कॉलेज कनेक्ट कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले, ज्यामध्ये मुळशी तहसील, पिरंगुट व आसपासच्या खेडेगावातील सुमारे चारशे विद्यार्थी व पालक यांचे नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020 बद्दल प्रबोधन करण्यात आले. (Pune)

या कार्यक्रमाचा उद्देश शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातील दरी कमी करणे, विकसित होत असलेल्या नविन शैक्षणिक प्रारूप यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा होता. NEP 2020 द्वारे उपलब्ध होणाऱ्या संधी आणि बदल जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या व मार्च 2024 मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत पास झालेल्या 12वी-इयत्तेच्या विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग या कार्यक्रमात पाहायला मिळाला. या कार्यक्रमात महाविद्यालयीन प्राध्यापक आणि तज्ज्ञांनी अभ्यासपूर्ण सत्रे दिली, उपस्थितांना पडलेल्या प्रश्नांची साधकबाधक उत्तरे दिली आणि मौल्यवान मार्गदर्शन केले. (Pune)

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि अनुकूलता वाढवण्याच्या दृष्टीने आणि महाविद्यालयाच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणामधील संक्रमण सहज सुलभ व्हावे यासाठी शाळा-कॉलेज कनेक्ट कार्यक्रमाची प्रभावीता, उपयुक्तता विद्यार्थ्यांचा सहभाग व अभिप्राय यातून दिसून आली. Pune

या कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी असे प्रतिपादन केले की, “एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांशी जोडले गेल्याने आणि NEP 2020 च्या ज्ञानाने त्यांना सशक्त बनवताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला पाठिंबा देणे आणि भविष्यातील आव्हानांसाठी त्यांना तयार करणे हे आमचे ध्येय आहे,” Pune

याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेजचे पिरंगुटचे प्राचार्य शिवाजी गोवेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा भरत कानगुडे, डॉ. प्रकाश पांगारे, डॉ. तानाजी काशीद, डॉ.स्मिता लोकरे, प्रा. वैभव साळवे, डॉ. ज्ञानेश्वर महाजन, प्रा. दिलीप सोनवणे, प्राशासकीय कर्मचारी नितीन शिंदे आदी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल

मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?

‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Barti : यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण; ‘इतके’ हजार रुपये मिळणार विद्यावेतन

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय