Saturday, October 12, 2024
HomeकृषीKisan Sabha : दिल्ली किसान सभेची बैठक; शेतकऱ्यांच्या "या" प्रश्नांवर होणार मंथन

Kisan Sabha : दिल्ली किसान सभेची बैठक; शेतकऱ्यांच्या “या” प्रश्नांवर होणार मंथन

दिल्ली : दिल्लीत किसान सभेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची 2 जुलै रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन होणार असून आंदोलनाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे. (Kisan Sabha)

देशभरात शेतकऱ्यांचे विविध प्रश्न अत्यंत तीव्र होत असून केंद्र सरकार सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे घेत आहे. देशभरात साडेतीन लाख टन दूध पावडर पडून असताना व दुधाचे भाव शेतकऱ्यांसाठी 24 रुपयापर्यंत खाली पडलेले असताना, केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

आत्मनिर्भरतेची बात करणारे केंद्र सरकार सातत्याने खाद्यतेल व तेलबिया आयात करते. त्यातून कोरडवाहू भागातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागतो. केंद्र सरकारने पुन्हा एकदा आपले हेच धोरण सुरू ठेवत खाद्यतेल आयात करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे व शेतीसाठी लागू केलेल्या जी.एस.टी. आणि इतर कर धोरणामुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शेतकरी त्यामुळे कर्जबाजारी होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने केलेल्या कर्जमाफी प्रमाणेच केंद्र सरकारने देशभर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणीही समोर येत आहे. (Kisan Sabha)

अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांची दिल्ली येथे 2 जुलै रोजी महत्त्वाची बैठक होत असून या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या या विविध प्रश्नांसाठी देशव्यापी संघर्ष उभा करण्याची रणनीती ठरविण्यात येणार आहे.

किसान सभेचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व राष्ट्रीय सचिव विजू कृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीमध्ये हनन मौला, नवनिर्वाचित खासदार आमरा राम, पी. कृष्णप्रसाद, बादल सरोज, अमल हलदर, वलसन पनोली, पवित्र कार, पी. शन्मुघम, डॉ. अजित नवले, टी. सागर, आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल

मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?

‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Barti : यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण; ‘इतके’ हजार रुपये मिळणार विद्यावेतन

संबंधित लेख

लोकप्रिय