Gurgaon : समाज माध्यमांवर प्राण्यांवर अत्याचार करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशात आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. एका तरुणाने लिफ्टमध्ये असलेल्या कुत्र्याला त्याचा वॉकरने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. ३० जून रोजी एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये घडलेली ही घटना, लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Animal abuse)
काय आहे प्रकरण ! (Gurgaon)
गुडगावच्या तत्वम सोसायटीमध्ये तरुण एका कुत्र्याला वॉकर लिफ्टमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. लिफ्टमध्ये कोणीच नसताना, रागाच्या भरात तरुणाने कुत्र्याला पट्ट्याने मारले. त्यानंतर तरुणाने कुत्र्याला अक्षरश: फास लागेल अशा पद्धतीने पकडले, उचलून फेकले, आणि त्याला शिवीगाळ केली. हा संपूर्ण प्रकार लिफ्टमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ३० जून रोजीची हि घटना असल्याचे सांगितले जात आहे.
सोशल मीडियावर संताप
ही घटना समोर येताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेक प्राणी प्रेमींनी या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ विदित शर्मा या व्यक्तीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, “या तरुणावर कारवाई झालीच पाहिजे. जर तुम्ही भाड्याने वॉकर घेत असाल तर कृपया त्यांचे बारकाईने निरीक्षण करा. प्राण्यांवरील अत्याचार अस्वीकार्य आहे.”
कायदेशीर कारवाईची मागणी
सर्वसामान्य नागरिकांनी तसेच प्राणी प्रेमींनी पोलिसांकडे हल्ला करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत, कुत्र्यावर झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे मन दुखावले असल्याचे सांगितले आहे.
प्राण्यांचे संरक्षण आवश्यक
या घटनेने पुन्हा एकदा प्राण्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर प्रकाश टाकला आहे. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे आणि त्यांची अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. प्राणी प्रेमींनी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी यावर त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे
मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !
IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!
ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात
नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस
मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल
मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?
‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!
Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती