Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीसरपंच कोणाला पण करा, पण हे एकदा वाचा !

सरपंच कोणाला पण करा, पण हे एकदा वाचा !

पुणे : ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या असून ग्रामपंचायतीच्या सार्वांगिण विकासासाठी लोकप्रतिनिधी योग्य गरजेचे आहेत. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्या, सदस्य, पँनल प्रमुख हा लोकाभिमुख असणे गरजेचे आहे.

लोकप्रतिनिधी गावामधील लोकांमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजणारा नसावा. गावचा होणारा सरपंच गावात राहणारा असावा, जेव्हा गावाला अडचण असेल तेव्हा वेळेवर मदत करणारा असावा.

जर गावामध्ये भीषण दुष्काळ पडलेला असताना शासनकडून लोकांना पाण्याची व्यवस्था करणारा असावा. गावाच्या विकासासाठी आलेला 14 वा वित्त आयोग निधी / पेसा निधी लोकहितासाठी वापरणारा असावा.

शासनाचे स्कीम लाभार्थींना फसवून पैसे उकळून पुन्हा वाटून खाणारे नसावा. MRGS मधून  मिळालेल्या विहिरीच्या लाभार्थीकडून कमिशन घेणार नसावा.

ग्रामपंचायत सदस्य सदस्या आपल्या वार्डतील समस्याची जाणीव असणारा आणि प्रश्न सोडविणारा असावा. गावात मंजूर झालेल्या विविध सरकारी योजनेची काम अर्धवट करून पूर्ण बिल उचलणारा आणि शाळेतील मुख्याध्यापला सोबत घेऊन धाब्यावर जाणारा नसावा.

गावातील सर्व पदे आपल्याच घरात ठेवणारा नसावा, गावातील सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारा असावा. सरपंच आणि प्रशासन एखादा सामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात कामानिमित्त गेल्यावर त्याच्या बरोबर विनम्रपणे बोलणारा असावा त्याच्या समस्या काय आहे ते जाणून घेणारा असावा.

गावातील घनकचरा गटारी रस्ते यांचे नियोजन करून स्वच्छ ठेवणारा आणि प्रशासनावर वचक ठेवणारा असावा. कायम वर वर गोड गोड गप्पा

मारून हात हलुन फसवनारा तर अजिबात नसावा. जवळच्या व्यक्तीची कामे करणारा नसावा सर्व समाजातील लोकांची कामे करणारा असावा.

सरपंच झाल्यावर फक्त आपल्याच पँनलच्या लोकांची कामे करायची आणि विरोधी पँनलच्या लोकांची कामे करायची नाही असा सरपंच नसावा. सरपंच झाल्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणारा असावा.

गावातील काही रिकामटेकडे गुंड प्रवुत्तीच्या लोकांना सोबत घेऊन आपल्या विरोधकांविरोधात गावातील आपल्यापेक्षा सभ्य, चांगल्या वरचढ व्यक्तिविरुद्ध षडयंत्र रचणारा नसावा. तू यांच्यात राहतो, त्यांच्या सोबत फिरतो तुला बघून घेईन मी तुझ्या कामात आलो होतो अशी उपकाराची धमकीची भाषा करणारा नसावा

दारु पाजून तरुणांना बिघडवणारा व फक्त मतदानासाठी वापर करणारा नसावा. ग्रामपंचायत मधून कमावलेल्या पैशांतून लोकांना मटण, दारू पार्टी देणारा नसावा.

गावात लग्नसोहळा, मरण धरण याठिकाणी चमकोगिरी करून श्रेय लाटणारा नसावा. गावातील आरोग्य केंद्राकडून पैशांची मागणी करणारा नसावा.

गावासाठी खरेदी केलेल्या एलइडी बल्ब खरेदीत कमिशन खाणारा नसावा. गावाला मिळालेल्या तंटामुक्त गावचे बक्षीस भ्रष्टाचार करून खाणारा नसावा

गावात निवडून येण्यासाठी लोकांना पैसे वाटून, पार्ट्या देऊन निवडून येणारा नसावा. गावात पहिल्यांदा निवडून आल्यानंतर लबाडीने सरपंच झाल्यावर पुढे जाऊन जिल्हा परिषद सदस्य बनण्याचे स्वप्न बघणारा नसावा.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय