Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांना वाव कधी मिळणार ? महाराष्ट्र जनभूमीचा स्पेशल रिपोर्ट

ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांना वाव कधी मिळणार ? महाराष्ट्र जनभूमीचा स्पेशल रिपोर्ट

  

पुणे : ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झालेली असून सत्ताधारी पक्षासह विरोध पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. विविध घोषणा आता होताना दिसत आहे. परंतु गावाच्या राजकारणात तरुणांना संधी मिळणार का? हा प्रश्न तरुणांच्या मनात निर्माण होत आहे.

ग्रामपंचायत निवडणूका म्हटल्या की भावकी – गावकी, तंटे, हेवेदावे, पक्षांचे राजकारण यावरती सर्व अवलंबून असते. हा आजपर्यंत इतिहास आहे. परंतु गावविकासासाठी हे सर्व हेवेदावे बाजूला ठेऊन तरुणांनी संधी मिळणार का ? हे निवडणूक संपल्यानंतर समजेल. 

आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर पिढ्यानपिढ्या तेच राजकारण करत आहेत. परंतु पिढ्यानपिढ्याच्या राजकारणाला फाटा कधी देणार ? आज तो देण्याची गरज निर्माण झाली असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे. 

पश्चिम आदिवासी भागाचा विचार केला तर सुविधांचा अभाव दिसतो. त्याला गावातील पुढारी जबाबदार आहेतच परंतु नागरिक ही तितकेच जबाबदार आहे. विकासाची दिशा नसलेले, स्वार्थी राजकारण, संधीसाधू, वर्षानुवर्षे आलटून पालटून तेच लोक आपल्याला या राजकारणात खिळलेले दिसतात. परंतु गावातील सोयी – सुविधांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे अनेक गावांची व्यथा आहे.

गावचे हे चित्र बदलायचे असेल तर सुशिक्षित, तळमळ, जिद्द आणि प्रामाणिक व्यक्तींंची गरज आहे. ती उणीवा तरुणच पुर्ण करु शकता. परंतु मुरलेल्या आणि राजकीय डावपेच आणि पाडापाडीच्या राजकारणातील मल असलेल्या म्हताऱ्यांना तरुणांनी गाव राजकारणात मार्गदर्शकाच्या भूमिकेत आणण्याची गरज आता दिसत आहे. आपल्या बुध्दीने आणि संपूर्ण समाजाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या राजकारणाची खरी गरज आहे.

पिढ्यानपिढ्या बापाच्या कर्तुत्वावर रेघोट्या वढणाऱ्या त्यांची जागा दाखविण्याची हिच योग्य वेळ आहे. गावविकासासाठी तरुणांनी पुढे आले तर गावाचा विकास होईल.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वापराच्या पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, हमीभावाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न अशा असंख्य प्रश्नांना तरुणच मार्ग देऊ शकेल. अशा दूरदृष्टी, प्रामाणिक , कर्तव्यदक्ष तरणांना संधी, खुर्चीला चिकटलेले राजकारणी मिळवून देतील ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय