Monday, May 6, 2024
Homeजिल्हाशहीद दिनी महापुरुषांना अभिवादन करत मुख्यमंत्री साहेब रोजगार द्या – युवा महासंघाची...

शहीद दिनी महापुरुषांना अभिवादन करत मुख्यमंत्री साहेब रोजगार द्या – युवा महासंघाची अनोखी रॅली

सोलापूर : महाराष्ट्र राज्यात लाखोंच्या संख्येने बेरोजगार आहेत. दिवसेंदिवस सुशिक्षित तरुणांची बेरोजगारी वाढत आहे. आज शेतकरी, आदिवासी, राज्य सरकारी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई केल्याशिवाय सरकार पुढे पाऊल टाकत नाही. नोकर भरती बंदी मुळे कित्येक शासकीय पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. रोजगार हमी योजनेची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. बेरोजगार तरुणांच्या वास्तवाशी खेळ करत असेल तर आगामी काळात बेरोजगार तरुणांचे राज्यव्यापी आंदोलन छेडणार असा आक्रमक पवित्रा संघटनेचे जिल्हा सचिव अँड.अनिल वासम यांनी घेतले. 

गुरुवारी 23 मार्च शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या महापुरुषांच्या स्वप्नातील भारत घडण्यासाठी युवकांच्या हाती रोजगार देण्याची गरज आहे. ही मागणी घेऊन जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली महापुरुषांना अभिवादन रॅली काढण्यात आली. 

Saluting the great men on Martyr's Day, Chief Minister Saheb Rozgar Give - Unique Rally of Yuva Mahasangh

या अभिवादन रॅलीची सुरुवात दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण व जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सकाळी 11 वाजता सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार मिळाले पाहिजे, मुख्यमंत्री साहेब रोजगार द्या, नको भाषणे नको आश्वासने नोकरी द्या, माझी नोकरी कोठे आहे? खाजगीकरण,कंत्राटीकरण रद्द करा.रिक्त पदे तातडीने भरा, नोकरभरती बंदी उठवा शिक्षण व रोजगार आमच्या हक्काचं अशा मागण्यांचे फलक घेऊन गगनभेदी आवाजात घोषणा देत रॅलीची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ.द्वारकानाथ कोटणीस पुतळा-महात्मा ज्योतिबा फुले पुतळा-छत्रपती संभाजी महाराज पुतळा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-पुण्यश्लोक अहिल्यादेवी व चार हुतात्मा पुतळा मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून येथे दुपारी १२ वाजता रॅलीचा समारोप करण्यात आला. राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी अभिवादन रॅलीस समारोपपर मनोगत व्यक्त केले. 

यावेळी सिटू चे राज्य महासचिव एम.एच.शेख, ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व संघटनेचे राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.  यावेळी जिल्हा कोष्याध्यक्ष बालकृष्ण मल्याळ, अशोक बल्ला, विजय हरसुरे, सनी कोंडा, मधुकर चिल्लाळ, आप्पाशा चांगले, बालाजी गुंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

नरेश गुल्लापल्ली, श्रीकांत कांबळे, अमित मंचले, दीपक निकंबे, योगेश आकीम, पुष्पा गुरुपनवरू, दिनेश बडगू, राकेश म्हेत्रे, सद्दाम बागवान, भानुचंद्र म्याकल, राहुल बुगले, सनी आमाटी मल्लेशम कारमपूरी, राहुल जाधव, मीरा कांबळे, अजय भंडारी, आदिनाथ चव्हाण, आनंद कसबे, राजू मरेड्डी, सीमन पोगुल, किशोर गुंडला, अंबाजी दोंतुल आदींनी परिश्रम घेतले.

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी मेगाभरती 

सीमा सुरक्षा दलात 1524 जागांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना संधी

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती सुरु

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय