Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणरुपश्री महिला विकास संस्थेच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी मार्गदर्शन पर...

रुपश्री महिला विकास संस्थेच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित


जुन्नर : रुपश्री महिला विकास संस्था व जिल्हा कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने
(दि. ६) गुगल प द्वारे सुशिक्षित बेरोजगार युवती 
महिलांसाठी विविध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी विषयी तसेच महाराष्ट्र श
ासनाच्या योजनांविषयी माहिती व मार्गदर्शन पर
कार्यक्रम आयोजित
करण्यात आलाहोता.

 

जुन्नर भागातील ग्रामीण
युवक-युवतींनी या कार्यक्रमाचा बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.
14 वर्षाच्या पुढील सर्वांनी आपले नाव नोंदणी करणे
आवश्यक असून त्याविषयी माहिती मिळविण्यासाठी वेबसाईट व कार्यालयाचा संपर्क नंबर
देण्यात आला.
माहिती मिळविण्यासाठी संपर्क करावा अशी सूचना देखील
सर्वांना करण्यात आली.
महिला बचत गटांचा सहभाग विचारात घेता आवश्यकता असल्यास
सर्वांसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात येईल असे असे सांगण्यात आले
.

 

या कार्यक्रमासाठी प्रमुख
वक्ते म्हणून अनुपमा पावर मॅडम असिस्टंट कमिशनर पुणे तसेच संकेत लोहार डिस्ट्रिक्ट
कॉर्डिनेटर हे मान्यवर यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रम हा रूपश्री महिला
विकास संस्था अध्यक्ष अश्विनी नवले त्याच प्रमाणे आदिवासी मुलींचे शासकीय
वस्तीग्रह जुन्नर येथील गृहपाल अर्चना पवार तसेच घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे
सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी साहेब हे देखील उपस्थित होते
.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय