Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोहिणी खडसे यांचा सत्कार 

PCMC : महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोहिणी खडसे यांचा सत्कार 

पिंपरी / क्रांतिकुमार कडुलकर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी समिती व शहरातील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. Rohini Khadse felicitated for being elected as the women state president

यावेळी विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवकचे शहराध्यक्ष इमरान शेख, राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते, समिती सदस्य देवेंद्र तायडे, राजन नायर, मौलाना अब्दुल गफार आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरांमध्ये शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन शहरांमध्ये विविध पदाची नियुक्ती केली जात असून पदाधिकारी यांनी प्रदेश कार्यालयामध्ये जाऊन वरिष्ठांच्या भेटी घेतल्या. यावेळी रोहिणी खडसे यांनी पक्षाने दिलेले जबाबदारी खूप मोठे असून महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांच संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार असून विविध ठिकाणी दौऱ्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच काही कालावधीनंतर पिंपरी चिंचवड शहराचाही दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय