Thursday, November 21, 2024
Homeआरोग्यPune : पुणे शहरात झिका आणि डेंग्यूचा वाढता धोका, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pune : पुणे शहरात झिका आणि डेंग्यूचा वाढता धोका, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : शहरात झिका व्हायरस आणि डेंग्यूच्या धोक्यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे डासांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, ज्यामुळे झिका आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. (Pune)

पुण्यात (Pune) एकट्या जुलै महिन्यात डेंग्यूचे एकूण 216 संशयित रुग्ण आढळले आहेत, ज्यामध्ये 156 रुग्ण हे केवळ या आठवड्यातील आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून त्यांचा नाश करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

पुणे शहरात झिका व्हायरसच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. सध्या पुण्यात झिकाचे 23 रुग्ण आढळले आहेत. झिकाच्या रुग्णांमध्ये 10 गर्भवती मातांचा समावेश आहे. गर्भवती महिलांसाठी झिका व्हायरस अधिक धोकादायक असतो कारण तो गर्भाला नुकसान पोहोचवू शकतो. पुण्यापाठोपाठ कोल्हापूर आणि संगमनेर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. सासवड, मुळशीतील भूगाव येथे देखील प्रत्येकी एक झिका व्हायरस रुग्ण आढळून आला आहे. पालिकेकडून गर्भवती महिलांच्या चाचण्या आणि तपासणीवर विशेष भर दिला जात आहे.

पुण्यात चिकुनगुनियाचे 15 रुग्ण आढळले आहेत. फेब्रुवारी महिन्यात 5, मार्च महिन्यात 4, एप्रिल महिन्यात 2 आणि आता जुलैमध्ये 5 रुग्ण आढळले आहेत. या परिस्थितीने आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे.

पाणी साचू न देणे, डास प्रतिबंधक उपाय करणे आणि घराबाहेरील डासांची उत्पत्ती नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ

मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

मोठी बातमी : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार

धक्कादायक : अंगणवाडीत शाळेत पोषण आहारात आढळले बेडक

निवासी आदिवासी आश्रमशाळांची वेळेबाबत आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले पहा !

दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार

संबंधित लेख

लोकप्रिय