Wednesday, February 19, 2025

Nita Ambani : ‘हे लग्नघर आहे माफ करा…’ नीता अंबानी यांनी मागितली माफी ; वाचा काय आहे कारण !

मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळा थाटमाट 12 जुलै रोजी पार पडला. या थाटमाटानंतर 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद कार्यक्रम आणि 14 जुलै रोजी ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याआधी मार्च आणि मे महिन्यातही नेत्रदीपक प्री-वेडिंग फंक्शन्सचा देखणा आनंद अनुभवण्यात आला. या सर्व फंक्शन्समध्ये अंबानी कुटुंबाने देश-विदेशातील सेलिब्रिटी पाहुण्यांना आमंत्रित केले होते. (Nita Ambani)

विवाह सोहळ्यानंतर नीता अंबानींचा (Nita Ambani) एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नीता अंबानी यांनी कॅमेऱ्यासमोर सगळ्यांची माफी मागितली आहे. वरमाई असलेल्या नीता अंबानी यांनी अनंत-राधिकाच्या लग्नात बरीच धावपळ केली असल्याचे दिसून आले. देश-विदेशातील खास पाहुण्यांचे स्वागत करण्यासह मुलाच्या लग्नाच्या विधींवरही नीता अंबानी स्वत: लक्ष ठेवून होत्या.

काय म्हणाल्या Nita Ambani ?

नीता अंबानी (Nita Ambani) यांनी व्हिडिओत म्हटले की, ”तुम्ही सगळे माझ्या अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी इतक्या दिवसांपासून आहात. त्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. हे लग्न घर आहे आणि तुम्ही सर्वजण या आमच्या आनंदाच्या उत्सवाचा एक भाग झालात. आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद आणि काही चूक झाली असेल तर हे लग्नघर आहे म्हणून माफ करा. आशा आहे की तुम्हा सर्वांना उद्याचे निमंत्रण मिळाले असेल, त्यामुळे तुम्ही उद्या पाहुणे म्हणून यावे. उद्या कुटुंबासह तुम्हा सर्वांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या नीता अंबानी यांच्या या व्हिडिओवर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. नीता अंबानींनी मागितलेल्या माफीचे कौतूक केले जात असून सहानुभूती आणि विनम्रता कशी असावी, हे यांच्याकडून शिकावे, असेही नेटकरी म्हणत आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ

मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

मोठी बातमी : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार

धक्कादायक : अंगणवाडीत शाळेत पोषण आहारात आढळले बेडक

निवासी आदिवासी आश्रमशाळांची वेळेबाबत आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले पहा !

दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार

Mumbai University : मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध जागांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles