Monday, June 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Hastinapur : गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ

हस्तिनापूर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या हस्तिनापूर येथे एक भयंकर घटना घडली आहे. ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिला आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. (Hastinapur)

---Advertisement---

राठौरा खुर्द गावात राहणाऱ्या नवनीत कौरची प्रसुतीची वेळ जवळ आली होती, तेव्हा तिची अचानक तब्येत बिघडली. तातडीने ऑपरेशनची गरज भासल्यामुळे नवनीतला मेरठच्या कस्बा मवाना येथील जेके हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुर्दैवाने, ऑपरेशन दरम्यान तिचा मृत्यू झाला. नवनीतसोबत तिचं बाळही दगावल्याची घटना घडली आहे.

नवनीतच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील औपचारिकता पूर्ण करून तिचा मृतदेह घरी आणला आणि स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार केले. चिता जळून राख झाली तेव्हा नवनीतच्या नवऱ्याला राखेत एक सर्जिकल ब्लेड दिसलं. हे पाहून सर्व नातेवाईक हडबडले.

---Advertisement---

संदीपने हे सर्जिकल ब्लेड उचलून तातडीने पोलीस स्टेशन गाठलं. ऑपरेशन दरम्यान नवनीतच्या पोटातच हे सर्जिकल ब्लेड राहिल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप संदीपने केला आहे. (Hastinapur)

या गंभीर घटनेनंतर मेरठच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याने तातडीने जेके हॉस्पिटलचा परवाना निलंबित केला आणि एक तपास समिती नियुक्त केली आहे. नवनीतच्या नातेवाईकांनी सीएम ऑफिसमध्येही तक्रार नोंदवली आहे. या घटनेत संबंधित डॉक्टरांचा दोष सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे एका गर्भवती महिलेला आणि तिच्या बाळाला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव शोकमग्न झालं आहे. तपास समितीच्या अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई होईल अशी आशा नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भातील वृत्त एका वृत्त संस्थेने दिले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

मोठी बातमी : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार

धक्कादायक : अंगणवाडीत शाळेत पोषण आहारात आढळले बेडक

निवासी आदिवासी आश्रमशाळांची वेळेबाबत आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले पहा !

दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार

Hastinapur

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles