Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यघरेलु कामगारांचे लसीकरण प्राधान्याने करण्याची क्रांतिकारी घरकामगार संघटनेची मागणी

घरेलु कामगारांचे लसीकरण प्राधान्याने करण्याची क्रांतिकारी घरकामगार संघटनेची मागणी

पुणे : घरेलु कामगारांना कामानिमित्त अनेक घरांमध्ये जावे लागते. त्यांचे लसीकरण झालेले नसल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी प्रवेश नाकारला जातोय आहे, त्यामुळे घरेलु कामगारांचे लसीकरण प्राधान्याने करण्याची क्रांतिकारी घरकामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेरी यांनी पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

घर कामगारांना प्रवेश नाकारला जात असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सरकारने त्यांच्यासाठी १५०० रू. चे तुटपुंजे सहाय्य जाहीर केले आहे. पण ते फक्त नोंदणीकृत घरकामगार यांच्यासाठी आहे. नोंदणी न झालेले  घरकामगार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्यांच्या नोंदणीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे डॉ. सुरेश बेरी यांनी सांगितले.

या कामगारांचे लसीकरण झाल्यास त्यांची सुटणारी कामे वाचतील आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळेल. या घरकामगार यांचे लसीकरण स्वतंत्रपणे प्रत्येक झोनमध्ये एक केंद्र उघडून प्राधान्याने व लवकरात लवकर करावी अशीही मागणी क्रांतिकारी घरकामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेरी यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय