Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणपुणे : ग्रामपंचायतींंकडून पेसा कायदाची अंमलबजावणीच्या माहिती अधिकारावर होणार सुनावणी : अपिलार्थी...

पुणे : ग्रामपंचायतींंकडून पेसा कायदाची अंमलबजावणीच्या माहिती अधिकारावर होणार सुनावणी : अपिलार्थी डॉ. कुंडलिक केदारी

पुणे : पेसा ग्रामपंचायतीने पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि जनजागृतीसाठी काय उपाययोजना केल्या, याबाबत बहुरंग संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांंनी माहिती मागवली होती. परंतु माहिती उपलब्ध न झाल्याने प्रथम अपिल दाखल केले असून १८ जून रोजी पंचायत समिती आंबेगाव या ठिकाणी सुनावणी होणार आहे.

आंबेगाव (जि. पुणे) तालुक्यातील ग्रामपंचायत आहुपे, तळेघर, राजेवाडी, गोहे खु., पिंपरगणे, राजपूर, फलोदे, चपटेवाडी, बोरघर, तिरपाड, गंगापूर खुर्द, फुलवडे, कोंढवळ यांंच्याकडे पेसा कायद्याबाबत माहिती मागविण्यात आली होती.  परंतु माहिती न मिळाल्यामुळे डॉ. केदारी यांनी प्रथम अपिल दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीतून ग्रामपंचायती कारभाराची भांडाफोड होणार, असेही डॉ. केदारी यांनी “महाराष्ट्र जनभूमी” शी बोलताना सांगितले.

पेसा कायदा संदर्भात मागवलेली माहिती पुढीलप्रमाणे : 

१. पेसा, वनअधिकार कायदा अंमलबजावणीसाठी कार्यशाळा, प्रशिक्षण शिबीरे, फिल्म शो चे आयोजन तसेच जनजागृती साहित्य म्हणून माहिती पुस्तके, डीव्हीडी फिल्म, जनजागृती गीते डीव्हीडी खरेदी करून मतदारांना पोहचविल्या काय ? खर्चाची माहिती मिळावी.

२. सन २०१७-१८ आणि २०१८-१९ संस्कृती, प्रथा, परंपरा, कला जतन आणि संवर्धन करण्याठी दोन वर्षात कोणकोणते उपक्रम राबविले त्याचे दस्तऐवज आणि खर्चाची माहिती मिळावी. तसेच आदिवासी कलावंतांची यादी मिळावी.

३. ग्रामपंचायत आणि ग्रामसभा सक्षम करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबविले ? दोन वर्षातील ग्रामसभाचे अध्यक्षपद कोणी भुषविले, त्यांची नावे, पदाधिकारी ? या ग्राम सभेसाठी गाव तलाठी, पोलीस पाटील, अरोग्य अधिकारी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, कृषी अधिकारी, विजमंडळाचे अभियंता, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, वनपाल यांना निमंत्रीत केलेल्या पत्राच्या प्रती आणि पोच पावत्या मिळाव्यात.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय