Pune / डॉ. अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे एस.एम.जोशी कॉलेजमध्ये मुलींचे निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर दि.२३ मे २०२४ ते ६ जून २०२४ या दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या शिबीराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संजाली डायस सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट जी.एस.टी.एन. नवी दिल्ली व रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रिं.डॉ. ज्ञानदेव म्हस्के, महाविद्यालय विकास समीतीचे सदस्य अमर तुपे उपस्थित होते. (Pune)
या शिबिरासाठी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दिलीप तुपे यांनी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनिंना मार्गदर्शन करताना संजाली डायस म्हणाल्या की, लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होण्यासाठी कठोर मेहनत करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विविध माध्यमांद्वारे रुंदावल्या पाहिजेत. ज्ञान व माहिती यामधील फरक त्यांनी समजून घेतला पाहिजे. योग्य ठीकाणी ज्ञानाचा उपयोग करता येणे गरजेचे आहे. तरच त्या ज्ञानाला अर्थ आहे. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी योगाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य, योगा करून आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (Pune)
रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रिं.डॉ.ज्ञानदेव म्हस्के म्हणाले की, मुलींसाठी निवासी शिबीर हे अतिशय लाभदायक ठरले आहे. ग्रामीण भागातील मुली लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देवून अधिकारी होऊन आपल्या पदाचा वापर जनतेच्या सेवेसाठी करतील. कोणताही जनसेवक हा कनवाळू मनाचा असला पाहिजे. कारण सामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते. या मुलींमध्ये तो गुण असल्यामुळे भविष्यामध्ये त्या नक्कीच चांगल्या अधिकारी बनलील असे मत ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केले.
महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमर तुपे म्हणाले की, महाविद्यालय व त्यातील सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक मान्यवरांनी मेहनत घेतली आहे. महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामधून अनेक विद्यार्थी अधिकारी होत आहेत. ही आनंदाची आणि गौरवाची गोष्ट असल्याचे मत अमर तुपे यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर काकडे म्हणाले की, या महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा सेंटर इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आह़े. कारण या स्पर्धा परीक्षा सेंटरमधून दरवर्षी अनेक विद्यार्थी क्लास वन आणि क्लास टू पदे मिळवीत आहेत. तरी मुलींसाठी निवासी शिबीर आयोजित करताना आम्हाला आनंद होत असल्याचे मत प्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी व्यक्त केले. शिबिरामध्ये संस्थेच्या २६ कॉलेज मधील एकूण ६० विध्यर्थिनी सहभागी होत्या.
पंधरा दिवसाच्या शिबिराचे अहवाल वाचन व कार्यक्रमाचे आभार स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा.अजित भोसले यांनी मानले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकिंग स्पर्धा परीक्षा केंद्राच्या समन्वयक डॉ.ज्योती किरवे यांनी केले. शिबिरासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, प्राध्यापक आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
हेही वाचा :
मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात
ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब
मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !
लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !
साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत
10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना विविध विभागात नोकरीची सुवर्णसंधी
ब्रेकिंग : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला थप्पड मारणारी महिला जवान निलंबित
एकही जागा न मागता मी सपोर्ट केला मला कॅबिनेट मंत्री करा – रामदास आठवले
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा
राहुल गांधी यांना एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा