Monday, May 6, 2024
Homeजिल्हागायरान जमीनी वरून उठवण्याच्या नोटीसा रद्द करा – शेतमजुर युनियनचे बेमुदत आंदोलन

गायरान जमीनी वरून उठवण्याच्या नोटीसा रद्द करा – शेतमजुर युनियनचे बेमुदत आंदोलन

जालना : दि.२९ मे २०२३ पासून राजेगाव ते घनसावंगी तहसील कार्यालय असा लॉंगमार्च काढून शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

गायरान जमीन कसणारांच्या नावे करा, १९७० पासुन गायरान जमीन कसत असलेले गायरान धारक यांच्या जमीनी त्यांच्या नावच्या करण्यासाठी अनेकवेळा राज्य सरकारने शासन निर्णय काढले होते, परंतु तत्कालीन प्रशासनाच्या निष्काळजी धोरणामुळे त्या जमीनी नावच्या झाल्या नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांत जमीनी नावच्या करण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात सुरू आहे.

आंदोलनातील मागण्या पुढीलप्रमाणे :

1.१९९१ च्या शासन निर्णयानुसार कसत असलेले गायरान कसणारांच्या नावे करून सात बारा चे वाटप करा.

  1. २०१० च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन तहसिलदार साहेबांनी गायरान जमीनी कसणारांच्या नावच्या कराव्यात.
  2. राहत्या घरातून निष्काशित करण्याच्या नोटीसा रद्द करून त्या घराचा मालकी हक्क द्या.
  3. हजारो वर्षांपासून अस्पृश्याचे जिवन जगणार्‍या समाजाला सन्मानाने जगण्यासाठी कसत असलेल्या गायरान जमीनी नावच्या करून सामाजिक न्याय हे महाराष्ट्राचे तत्व लागु करा.

या आंदोलनात मारोती खंदारे, भगवान कोळे, अंकुश मोहीते, सुभाष सुतार, अर्जुन सरवदे, संतोष येडे, शांताबाई घोरपडे, सुशिला सुतार, संगिता सुतार, माणिक सुतार, रामेश्वर सुतार, नितीन नाटकर तसेच घनसावंगी तालुक्यातील विविध गावचे गायरान जमीन धारक या आंदोलनात सहभागी झाले होते.

हे ही वाचा :

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय