जुन्नर : जुन्नर तालुक्यात नेहमी सत्तर ते शंभर पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण सापडत असतात मात्र आज तालुक्यात केवळ ३६ रुग्ण सापडल्याने प्रशासनासह नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.
आज गुळचंवाडी १३, दातखिळेवाडी ३, नेटवड २, बेल्हे २, वडगाव आनंद २, आळे २, सीतेवाडी १, उंचखडक १, ओतूर १, उदापुर १, बोरी बु १, हापूसबाग १, गोळेगाव १, वैष्णवधाम १, जुन्नर नगर परिषद ३ असे एकूण ३६ रुग्ण आढळले आहे तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे एकूण ऍक्टिव रुग्ण संख्या १ हजार ९८ असून एकूण मृत्यू ४६९ झाले आहेत.