Thursday, January 23, 2025

पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

बोईसर : सोन्याची खाण असलेल्या बोईसर औद्योगिक क्षेत्रातील लाचखोर पोलीस अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

राजू धुमाळ यांनी एका गुन्ह्यातील आरोपीला त्रास होऊ नये यासाठी आरोपीच्या पत्नी कडे लाच मागितली. आरोपीच्या पत्नीने यासंबंधी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक केल्यानंतर सापळा लावून ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

बोईसर पुर्वेकडील गुंदले भागातून गावकऱ्यांनी गायीची तस्करी करण्यासाठी आलेल्या लोकांना पळवून लावले होते. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. आरोपीला त्रास होऊ नये यासाठी पैशाचा तगादा पोलीस उपनिरीक्षक राजू धुमाळ यांनी लावला होता. याबाबत तक्रार ठाणे लाचलुचपत विभागाला दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी साधारण 6:30 च्या सुमारास लाच 15 हजार रूपये घेताना पकडले. लाचलुचपत विभागाकडून पुढील कारवाई बोईसर पोलीस ठाण्यात सुरू आहे. 

गायींची तस्करी बाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात तपासाच्या नावाखाली अनेकांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुंदले भागात पोलीस उपनिरीक्षक राजू धुमाळ व लिपीक पवार हे याभागात वारंवार येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. 


Related Articles

- Advertisement -

Latest Articles