Monday, January 13, 2025
HomeNewsरामटेक : बोरी येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्याने SFI आयोजित चित्रकला स्पर्धेचे...

रामटेक : बोरी येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्याने SFI आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

रामटेक (नागपूर) : 12 जानेवारी, युवा दिनी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बोरी(खंडाळा) येथे विद्यार्थ्यांचा जोशात संपन्न झाला. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने कोरोना चा काळात विद्यार्थ्यांचा शिक्षणावर पडलेला वाईट परिणाम बघता ही स्पर्धा आयोजीत केली होती.  

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून SFI चे महाराष्ट्र राज्य समिती सदस्य, अमित हटवार लाभले तर अध्यक्षपद खंडाळा गावातील पोलीस पाटील, सौ. अनिता हटवार यानी भूषवले. मंचावर बोरी चे सरपंच रितेश झाडे, SFI चे रामटेक तालुका अध्यक्ष संदेश रामटेके, सचिव संघर्ष हटवार हे उपस्थित होते. 

कार्यक्रमाची प्रास्ताविक अमित हटवार यांनी केली, ज्यात स्वामी विवेकानंद ह्यांनी जगाला प्रेम, शांती आणि एकता चा संदेश  सर्वधर्मपरिषदेतून दिला. त्याच संदेशाची निकड आज भारताला आहे असे ही त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून मांडले. त्यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

बोरी येथील  इयता 10 वीत शिकणाऱ्या हर्षल सतिकोसरे यांनी पहिला, सिद्धांत ईश्वरजी मोहूर्ले, खंडाळा यांनी दुसरा तर इयता 5 वीतील जय तुकाराम पेटकुले यांनी 3 रा क्रमांक पटकावला. तसेच दिव्यांनी किशोर दिवटे ह्या 5 वीत शिकणाऱ्या मुलीला तिने काढलेल्या सावित्रीबाई फुले यांचा चित्राला प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत कारेमोरे तर आभार प्रदर्शन मितेश कारेमो रे यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर वाहणे, सुरज डुंडे, संदेश मेश्राम, सागर कारेमोरे, स्वप्निल कारेमोरे यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

लोकप्रिय