Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआंदोलनस्थळी रक्षाबंधन : आशा - गट प्रवर्तकांनी भावाला लढण्यासाठी साथ देण्याचा केला...

आंदोलनस्थळी रक्षाबंधन : आशा – गट प्रवर्तकांनी भावाला लढण्यासाठी साथ देण्याचा केला संकल्प!

नाशिक : नाशिक जिल्हा परिषेदवर आशागट प्रवर्तकांचा तिरंगा मोर्चा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षी आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना (आयटक) चे राज्य अध्यक्ष राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्च्याने परिसर दणाणून सोडला होता.

देशात कोरोना काळात आशा, गटप्रवर्तकांनी जीवावर उधार होऊन आरोग्य चे देशसेवेचे काम केले. मात्र, केंद्र व राज्य सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. देशात फक्त प्रवास भत्ता देऊन मोफत काम गटप्रवर्तकांकडून करून घेतले जात आहे. देशात 7 लाख वर आशा साठी 80 हजार वर गट प्रवर्तक कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्यात 72 हजार आशा साठी 4 हजार गटप्रवर्तक काम करतात. गाव पातळीवर 1 हजार लोकसंख्या मागे 1 आशा म्हणजे (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या) कार्यरत आहेत. 25 ते 40 आशा साठी 1 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्या आशांनी केलेल्या कामाचे नोंद ठेवणे, प्रत्येक गाव भेट देणे मार्गदर्शन आशांना करण्याचे काम करतात. मात्र, गटप्रवर्तकांना फक्त प्रवास भत्ता दिला जातो. गटप्रवर्तकां सारखेच काम करणारे महाराष्ट्रतील कंत्राटी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना आरोग्य विभाग ने वेतन सुसूत्रीकरण करून काही प्रमाणात वेतन वाढ केली. या बद्दल राज्य सरकार चे अभिनंदन आहे.

मात्र, गटप्रवर्तकांना का वगळले याचे उत्तर मिळत नाही. ह्या अन्याय विरोधात तीव्र लढा लढण्याचा निर्धार गटप्रवर्तक राज्यभर करत आहेत. कोरोना योध्या म्हणून आशा गटप्रवर्तकांचा सन्मान शाब्दिक केंद्र व राज्य सरकार करत आहे. मात्र, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाच्या राष्ट्रपती महिला झालेल्या असतांना मात्र आशा 24 तास काम करून अल्प मानधन वर राबवून घेतले जाते आहे. गटप्रवर्तकांना फक्त प्रवास भत्ता देऊन मोफत काम करून घेतले जात आहे. हीच अवस्था अनेक योजना कर्मचाऱ्यांची आहे. महिलांना सन्मान देतो म्हणणाऱ्या देशात शासकीय विभागात आर्थिक शोषण होत असेल तर खाजगी क्षेत्र बाबत न बोललेलं बरे. किमान वेतन मिळावे हा संकल्प ह्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षी करत लढण्याचा निर्धार आयटक च्या मोर्चा द्वारे करत आशा गटप्रवर्तकांनी केला.

भर पावसात मोर्चा काढत घोषणा देत भारत माता की जय म्हणत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिरायू होवो!! म्हणत 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षात आशा व गटप्रवर्तकांचे आर्थिक शोषण केंद्र सरकारने, राज्य सरकारने बंद करा, घोषणा देत, किमान वेतन लागू करा, लाल बावटा जिंदाबाद!! आयटक जिंदाबाद च्या घोषणा दिल्या. मोर्चा स्थळी आल्यावर निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी राजू देसले म्हणाले, गटप्रवर्तक, आशा बहिणींनी राखी बांधून या पुढे ही आमच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार व विश्वास वेक्त केला. हा विश्वास नक्कीच लढण्यासाठी प्रेरणादायी राहील. विदर्भ विभाग आशा व गटप्रवर्तक मेळावे 10 दिवस करून आल्यानंतर आशा व गटप्रवर्तकांनी आयटक संघटना वर दाखवलेला विश्वास व लढण्याची दिलेली ऊर्जा महत्वाची आहे. ह्याच विश्वासाने संघटना काम करेल.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय