Friday, March 29, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपूर्णानगर येथे हरघर तिरंगा मोहीम

पूर्णानगर येथे हरघर तिरंगा मोहीम

पिंपरी चिंचवड : पूर्णानगर येथील मोरया अपार्टमेंट मध्ये हर घर तिरंगा या शासनाच्या मोहिमेला पाठिंबा देत राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात, सोसायटी चे चेअरमन संतोष गायकवाड आणि राजेंद्र चकटे उपस्थित होते.
तिरंगा म्हणजे भारतीय स्वतंत्र लढ्याचे प्रतीक आहे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून घरोघरी तिरंगा हर घर तिरंगा या देसव्यापी अभियानात सहभागी होऊ या आणि प्रत्येक सोसायटी, सेपरेट घर, बंगलो मधील सर्व लहान थोर मंडळी एकत्र येऊन तीनही दिवस स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूयात आणि आपल्या लहान मोठ्या मुलांच्या हृदयात देशाभिमान जागृत करूया.

अशा या मोहिमेत सहभागी होऊन या वर्षी नक्कीच पूर्ण भारतभर तिरंगा असेच चित्र दिसेल. आजपासून तीन दिवस चालणाऱ्या “हर घर तिरंगा” अभियानादरम्यान चुकून किंवा अनावधानाने कोणाकडून राष्ट्रीय ध्वजाचा अवमान झाल्याचे दिसल्यास त्याला व्हायरल करू नका. समोरच्याला नीट समजावून सांगा व आपण त्याचा सन्मान राखण्यास मदत करा. त्याला बदमान करण्याच्या नादात आपणच तर जाणुन बुजुन राष्ट्र ध्वज अवमानना तर करत नाही ना ही बाब लक्षात ठेऊन ताबडतोब परिस्थिती हाताळा.

अशा प्रकारे जर प्रत्येक घर आणि सोसायटी मध्ये आपण हर घर तिरंगा मोहीम राबवून आपल्या लहान मुलांना एक आदर्श घडून द्यावा असे आवाहन मोरया अपार्टमेंट मधील नागरिकांकडून करण्यात आले. मोरया अपार्टमेंट ने साजरा केलेला हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नक्कीच इतरही सोसायटी साठी आदर्श ठरेल.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय