Thursday, April 25, 2024
Homeजुन्नरजुन्नर : देवळे येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

जुन्नर : देवळे येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

जुन्नर : देवळे (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निमगिरी आणि बल्लाळवाडी केंद्राची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती या केंद्रांचे केंद्रप्रमुख संजय जाधव यांनी दिली.

यावेळी तज्ञ मार्गदर्शक संभाजी आडागळे यांनी आनंददायी शिक्षण, हसतखेळ शिक्षण विद्यार्थ्यांनी कसे शिकायचं या संदर्भात मार्गदर्शन केले. दुसरे तज्ञ मार्गदर्शक गुणवंत केदारी व सचिन गंधट यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण परिषद आयोजक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवळे या शाळेने आपली लोककला म्हणून “शिवनेरीवर रक्त सांडले पवित्र झाली धरा, आजही साक्ष देतो कोळी महादेव चौथरा ” हे आदिवासी नृत्य सादर करून उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले.


यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्राचे केंद्रप्रमुख संजय जाधव यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी जयश्री गडगे यांच्या वतीने शिक्षक परिषदेसाठी उपस्थित मान्यवर आणि मुख्याध्यापकांना साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांनी केले.

याप्रसंगी जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे, जि.प.शाळा, देवळे च्या मुख्याध्यापिका अनिता कु-हाडे, जि.प.शाळा, निमगिरी चे मुख्याध्यापक सोमा केदारी, महिला अध्यक्षा स्वप्नजा मोरे, महेंद्र देशपांडे आणि शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी चिंचेची वाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक गणेश भोर, सीमा कवडे, स्वाती भोर आणि केंद्रातील सर्वच शिक्षकांनी परीश्रम केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय