Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाकागल पोलिस ठाण्यात राखी पौर्णिमा उत्साहात साजरी

कागल पोलिस ठाण्यात राखी पौर्णिमा उत्साहात साजरी

कोल्हापूर : डी. आर. माने महाविद्यालय, कागल एन. सी. सी विभाग आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कागल पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक सातुसे यांनी आपल्या सुमधुर शब्द सुमनांनी करून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सांगितला. त्यानंतर विवेक पोतदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रमुख कागल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव यांनी आपल्या ओघवत्या शब्दात मनोगत व्यक्त केले.

ते बोलताना म्हणाले की, लोकांची सेवा करत असताना आम्हाला आमच्या बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी ही वेळ मिळत नाही. याची खंत वाटते. परंतु ही खंत एन.सी.सी कॅडेट व माजी विद्यार्थी संघ यांनी आज भरुन काढली. याचा आनंद वाटतो आहे. यानंतर कॅप्टन डॉ संतोष जेठिथोर यांनीही एन.सी.सी.व पोलिस यांचा संबंध यामाध्यमातून दृढ असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रा. आबासाहेब चौगले, एन.सी.सी. कॅडेट व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत पोतदार यांनी केले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय