जुन्नर : पश्चिम आदिवासी भागातील
खिरेश्वर येथे सत्वशील हरिश्चंद्र बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान, खिरेश्वर यांच्या वतीने खिरेश्वर येथे आदिवासी क्रांतिकारक प्रतिमा पूजन करून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून harishchandragad.in या वेबसाईटचे उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी बुधाजी कवटे, सिताराम कोरडे, किसन मेमाणे, भिमाजी मेमाणे, राहुल कोरडे, नितीन मेमाणे, संजय कोरडे, रवींद्र भौरले, महेंद्र गवारी, नितिन मुठे, विठ्ठल मुठे, आदित्य कवटे, अमोल कोरडे, सार्थक मेमाणे, अलका कोरडे, जागृती कोरडे, जयश्री कोरडे व शिवराज कोरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी अमोल कोरडे यांनी मार्गदर्शन केले harishchandragad.in ही वेबसाईट पर्यटन वाढीच्या दृष्टीने कशी महत्वाची आहे, यामुळे पर्यटक वाढतील व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील हे उपस्थितांना समजावून सांगितले. नितिन मेमाणे यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानले.