Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाकम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मोटारसायकल रॅली व कॉर्नर सभा

कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मोटारसायकल रॅली व कॉर्नर सभा

नंदुरबार : आज दि 12 ऑगस्ट 2022 रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम पंधरवडा जाहीर करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार जिल्हयात मोटारसायकल रॅली व कॉर्नर सभा घेऊन जनजागृती करण्यात आली.

या रॅलीत माकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य कॉम्रेड नथू साळवे, कॉम्रेड जयसिंग माळी, जिल्हा सचिव कॉम्रेड शामसिंग पाडवी, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. रुबाबसिंग ठाकरे, कॉ. अनिल ठाकरे, कॉ. रामसिंग मोरे, डी वाय एफ आयचे जिल्हा सचिव कॉ. सुदाम ठाकरे, शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव कॉ. सुभाष ठाकरे, किसान सभेचे तळोदा तालूका अध्यक्ष कॉ. कैलाश चव्हाण, रमण पवार, तुळशिराम ठाकरे यांच्यासह 35 मोटारसायकलीसह नागरिक सहभागी झाले होते.

रॅली मोड ता. तळोदा येथून बोरद, मोरवड, तळवे, आमलाड, मार्गे तळोदा शहरात स्मारक चौक येथे कार्नरसभा घेऊन प्रकाशाकडे रवाना झाली. प्रकाशा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कॉर्नरसभा घेण्यात आली. तसेच रॅली प्रकाशाहून शहादा शहराकडे रवाना झाली, शहादा शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रातंकचेरी जवळ बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहादा पंचायत समितीच्या आवारात क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले व सावित्री फुले यांना पुष्प अर्पण करून मानवंदना देऊन कॉर्नर सभा घेऊन वाजता रॅलीची सांगता करण्यात आली.

तसेच आज नंदुरबार तालुक्यात रॅली व चलेजाव चळवळीतील शहिद शिरीषकुमार, शहिद स्मारक नंदुरबार येथे शहिदांना मानवंदना देऊन कॉर्नर सभा घेण्यात येणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय