Thursday, May 2, 2024
Homeआंबेगावघोडेगाव : घरेलू काम करणाऱ्या महिलेचा छळ करणाऱ्या भाजप नेत्या यांना कडक...

घोडेगाव : घरेलू काम करणाऱ्या महिलेचा छळ करणाऱ्या भाजप नेत्या यांना कडक शिक्षा करा – जनवादी महिला संघटनेची मागणी

घोडेगाव : घरेलू काम करणाऱ्या महिलेचा छळ करणाऱ्या भाजप नेत्या सीमा पात्रा यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्या वतीने आंबेगाव तहसील कार्यालय येथील निवासी नायब तहसीलदार ए. बी.गवारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेण या घटनेचा जनवादी महिला संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. निवेदन देतेवेळी जनवादी महिला संघटनेच्या कमल बांबळे, अंकिता ढमढेरे, आशा लोहकरे इ.उपस्थित होत्या.

झारखंडच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सीमा पात्रा यांनी आपल्या घरेलू कामगार करणाऱ्या आदिवासी समुदायातील सुनीता यांची अनेक वर्ष घरात डांबून ठेवून भीषण आणि अमानुष पद्धतीने छळ केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे.

सदरील प्रकरणात राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, राष्ट्रीय एस.सी- एस.टी.आयोग आणि राष्ट्रीय महिल आयोग यांनी या घटनेची स्वतःदखल, घेऊन सुनीता यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोत्पारीने मदत करावी. व सर्वात उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाईच्या बरोबर त्यांच्या पुनर्वसनासाठी योग्य पावले उचलावीत अशी मागणी संघटनेने या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

देशातल्या एकूण कामकरी स्त्रियांमध्ये घरकामगारांची संख्या मोठी असली तरी त्या असंघटित क्षेत्रात असल्यामुळे त्यांना कसलीच मान्यता अथवा अधिकार नाहीत. मालकांच्या घरात चोवीस तास राहून घरेलू काम करणाऱ्या घरकामगारांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे, त्यांचे प्रचंड शोषण होत असून काही जणी मानवी तस्करीच्या देखील शिकार आहेत. या पार्श्वभूमीवर घरेलू कामगारांना संरक्षण देणारा कायदा शासनाने त्वरित करावा आणि भाजप नेत्या सीमा पात्रा यांना कडक शिक्षा करावी अशी आग्रही मागणी जनवादी महिला संघटनेने या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय