Thursday, November 21, 2024
Homeजिल्हाPune : आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध! 

Pune : आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध! 

पुणे : राज्य शासनाने शिक्षणात कायद्यात सुधारणा करून ‘खाजगी शाळांच्या परिसरात जर सरकारी अथवा अनुदानित शाळा असल्यास त्यांनी २५ टक्के राखीव मोफत प्रवेश करण्याची गरज नाही’ असा आदेश काढला आहे. या आदेशामुळे पुणे शहरातील वस्तीतील मुलांना खाजगी इंग्रजी शाळात प्रवेश मिळणार नसल्याने आप पालक युनियन च्या नेतृत्वात दिनांक २ एप्रिल रोजी चाफेकर वस्ती, गणेश खिंड रोड, शिवाजीनगर येथे आरटीई कायदा प्रतीची होळी करण्यात आली. RTE Pune

नवीन शिक्षण धोरणात पूर्व प्राथमिक शाळेपासूनच दहावीपर्यंत शिक्षण हे दर्जेदार आणि सर्वांना परवडणारे असावे व त्याची जबाबदारी सरकारवर असेल असे म्हटले आहे. त्यामुळे सरकारने सर्वप्रथम अनुदानित आणि सरकारी शाळांमध्ये इंग्रजीची सोय तसेच त्याचा दर्जा सुधारणे यावर लक्ष द्यायला हवे.या शाळा उत्तम करा मग आमच्या मुलांना आम्ही या सरकारी शाळात घालू. आमची मुले वेगळ्या सरकारी शाळात आणि श्रीमंत पालकांची मुले उत्तम इंग्रजी शाळात हा भेदभाव सरकारने करू नये असे आवाहन पालक श्रीकांत भिसे यांनी केले.  

या नव्या बदलामुळे सरकारी, अनुदानित शाळा या नोंदणी मध्ये घेतल्याने उपलब्ध पटसंख्या ७७,००० दाखवली जात असली तरी यातील ६२,००० पट यापूर्वी पण उपलब्ध होता व दरवर्षी रिक्त राहत होता. ही वाढीव पटसंख्या केवळ फुगवटा असून पालकांनी या शाळा आधीच नाकारल्या आहेत. जनतेला आरक्षणाचे गाजर दाखवल्यामुळे या वेळेस ओबीसी, एससी, एसटी, आर्थिक दुर्बल तसेच मराठा समाजाला पण या जागा उपलब्ध असतील पण खाजगी शाळा मध्ये या मुलांना प्रवेश मिळणार नाही. पुण्यात सर्वच वसाहती परिसरात मोडकळीस आलेल्या, कमी पटसंख्येच्या पालिकेच्या शाळा आहेत, त्यामुळे खाजगी शाळात जागा रिक्त राहतील व त्याने शिक्षण हक्क कायदा भंग होईल असे या वेळेस आप पालक युनियन व आम आदमी पार्टी चे मुकुंद किर्दत यांनी सांगितले. 

या आरटीई आदेशाची होळी करण्याच्या आंदोलनात आप राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, श्रीकांत भिसे, प्रभाकर तिवारी, गणेश खेंगरे, नामदेव वाघमारे, नितीन गस्ती, राजू वाघ, अंकुश शेटके, सागर किंजकस्कर, उमर शेख, नितीन गायकवाड, सुनिल सकपाळ, रवि जमादार, ऋषिकेश भिसे, नितीन जाधव, सोहम वाघमारे, प्रमिला भिसे, वैशाली भिसे, प्रियांका जमादार, खुशबु तिवारी, आरती तिवारी, स्वाती रासगे, निलम आवळे, रूपाली जमादार, प्रणिता पुजारी, प्राजक्ता पुजारी, दिपा परदेशी, रवि कांबळे, सुशिल तिवारी, आश्विनी वाघ, सिमा वाघमारे, ज्योती बहादुर, नम्रता शिंदे, प्रजा प्रताप, निलम तिवारी, दीपक भकवाड, सुभाष काळे इत्यादी स्थानिक पालक सहभागी झाले होते.

Railway : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 733 पदांसाठी भरती

Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI..

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती

MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती

Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती

संबंधित लेख

लोकप्रिय