Saturday, April 27, 2024
Homeग्रामीणपुणे : आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने आक्रोश आंदोलन

पुणे : आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने आक्रोश आंदोलन

पुणे : बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा, आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य व जिल्ह्यातील अनेक मागासवर्गीय अधिकारी-कर्मचार्‍यांच्या संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले.

आक्रोश आंदोलनातील प्रमुख मागण्या 

– अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागासवर्ग यांना पदोन्नतीतील आरक्षण पूर्वीप्रमाणे देऊन सर्व पदे भरण्यात यावीत 

– इतर मागास वर्गालाही पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ‘फ्रीशिप वेळेवर देण्यात यावी

– शैक्षणिक शुल्क कमी करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढवण्यात यावी

– गट साधन केंद्रातील (बीआरसी) मानधन तत्त्वावर कार्यरत विशेष शिक्षक, विषय शिक्षक व इतर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे

याप्रमुख मागण्यांसह इतर १७ मागण्यांसाठी आक्रोश आंदोलन करण्यात आले बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा व आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बिरसा ब्रिगेड आदिवासी विचार मंचाचे शंकर घोड, नानासाहेब तिटकारे, संतोष असवले, निवृत्ती शेळकंदे, अनिल तिटकारे, भास्कर कुडळ, शंकर घोडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय